Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीचे समीकरण ठरवणार ‘हे’ दोन महत्त्वाचे सामने! पाकिस्तान जीव पुन्हा टांगणीाला

सुपर-८ फेरीतील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) या दोन संघांनी अधिकृतपणे उपांत्य फेरीत (Semifinals) आपले स्थान निश्चित केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 27, 2026 | 07:37 PM
उपांत्य फेरीचे समीकरण ठरवणार ‘हे’ दोन महत्त्वाचे सामने! (Photo Credit- X)

उपांत्य फेरीचे समीकरण ठरवणार ‘हे’ दोन महत्त्वाचे सामने! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • उपांत्य फेरीचे समीकरण ठरवणार ‘हे’ दोन महत्त्वाचे सामने!
  • पाकिस्तान पुन्हा नशिबाच्या भरवशावर
  • वाचा काय आहे समीकरण
कोलंबो: टी-२० विश्वचषक २०२६ आता (T20 World Cup 2026) आपल्या अंतिम टप्प्याकडे सरकत असून उपांत्य फेरीचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सुपर-८ फेरीतील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) या दोन संघांनी अधिकृतपणे उपांत्य फेरीत (Semifinals) आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, उर्वरित दोन जागांसाठी अद्याप चार संघांमध्ये चुरस कायम असून आगामी दोन सामने या विश्वचषकाचे भवितव्य ठरवणार आहेत.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे वर्चस्व

सुपर-८ मध्ये गट-१ मधून दक्षिण आफ्रिकेने, तर गट-२ मधून इंग्लंडने सलग दोन सामने जिंकून प्रत्येकी ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना जिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे, जो आता केवळ एक औपचारिकता उरला आहे. दुसरीकडे, इंग्लंडला  न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. या दोन संघांनंतर आता ‘भारत विरुद्ध वेस्ट इंडिज’ आणि ‘इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड’ या दोन लढतींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

IND vs WI: सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको; १० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ जखमा आजही ताज्या

पाकिस्तानचा जीव टांगणीला

गट-२ मधील समीकरणे अत्यंत रंजक बनली आहेत. शुक्रवारी कोलंबो येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आले आहे. इंग्लंड आधीच पात्र ठरला असला तरी, न्यूझीलंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे.

  • न्यूझीलंड जिंकल्यास: जर किवी संघाने इंग्लंडला पराभूत केले, तर ते ५ गुणांसह थेट उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
  • इंग्लंड जिंकल्यास: जर इंग्लंडने न्यूझीलंडला हरवले आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर दोन्ही संघांचे (न्यूझीलंड व पाकिस्तान) समान ३ गुण होतील. अशा वेळी नेट रन रेटच्या (NRR) आधारे निर्णय होईल. सध्या न्यूझीलंडचा रन रेट चांगला असल्याने पाकिस्तानला केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजयाची गरज आहे. थोडक्यात, पाकिस्तानचे भवितव्य आता पूर्णपणे नशिबावर आणि दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

गट-१ मधून दक्षिण आफ्रिकेसोबत दुसरा कोणता संघ उपांत्य फेरीत जाणार, याचा निर्णय १ मार्च रोजी कोलकाता येथे होईल. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी सुपर-८ मध्ये आतापर्यंत दोनपैकी प्रत्येकी एक सामना जिंकला असून दोघांचेही समान २ गुण आहेत. १ मार्चचा हा सामना खऱ्या अर्थाने बाद फेरीसारखा असेल. जो संघ या सामन्यात बाजी मारेल, तो ४ गुणांसह थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळवेल. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघासाठी वेस्ट इंडिजचे ‘पॉवर हिटर्स’ रोखण्याचे मोठे आव्हान असेल.

T20 World Cup 2026: वडिलांच्या निधनानंतर Rinku Singh पुढील सामना खेळणार की नाही? BCCI ने दिले मोठे अपडेट

Web Title: These two crucial matches will decide the semi final pakistan needs luck again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • England
  • pakistan
  • South Africa
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs WI: सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको; १० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ जखमा आजही ताज्या
1

IND vs WI: सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको; १० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ जखमा आजही ताज्या

T20 World Cup 2026: वडिलांच्या निधनानंतर Rinku Singh पुढील सामना खेळणार की नाही? BCCI ने दिले मोठे अपडेट
2

T20 World Cup 2026: वडिलांच्या निधनानंतर Rinku Singh पुढील सामना खेळणार की नाही? BCCI ने दिले मोठे अपडेट

रिंकू सिंगच्या वडिलांच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोककळा, माजी क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली! Post Viral
3

रिंकू सिंगच्या वडिलांच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोककळा, माजी क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली! Post Viral

ENG vs NZ : एक विजय न्यूझीलंडला पोहोचवेल उपांत्य फेरीत! इंग्लंडशी होणार सामना, लागणार का सेमीफायनलचे तिकीट?
4

ENG vs NZ : एक विजय न्यूझीलंडला पोहोचवेल उपांत्य फेरीत! इंग्लंडशी होणार सामना, लागणार का सेमीफायनलचे तिकीट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.