व्हिडीओ बनवा आणि WhatsApp चं भांड फोडा! Telegram देतोय लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, काय म्हणाला Pavel Durov?
प्रत्येक स्मार्टफोन युजर्सच्या फोनमधील दोन लोकप्रिय मेसेजिंग अॅप्स म्हणजे टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगभरात लोकप्रिय आहेत. या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील वाद काही नवा नाही. येत्या काही काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांच्यातील वाद वाढला आहे. आता या वादाला एक नवं वळण देण्यात आलं आहे. या वादामध्ये सोशल मीडिया युजर्सना देखील सहभागी करण्यात आलं आहे.
टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांच्यातील वादाला नवं वळण देण्यासाठी टेलीग्रामचे को-फाउंडर आणि सीईओ पावेल डुरोव यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. शिवाय त्यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर देखील एक घोषणा केली आहे. पावेल डुरोव यांनी व्हॉट्सअॅपवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅपला स्वस्त कॉपीकॅट असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर पावेल डुरोव यांनी एक स्पर्धा देखील आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 50,000 डॉलर्स म्हणजेच तब्बल 2.72 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण ही रक्कम जिंकण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Few WhatsApp users realize they’re using a copycat. Over 80% of its features were copied from Telegram — years later. pic.twitter.com/h4Yx5AX3YL
— Pavel Durov (@durov) May 18, 2025
पावेल डुरोव यांनी सोशल मीडिया आणि लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, व्हॉट्सअॅपवर निशाणा साधत एक TikTok-स्टाईल व्हिडीओ तयार करायचा आहे. या व्हिडीओमध्ये व्हॉट्सअॅपने टेलिग्रामची कशा प्रकारे नक्कल केली आहे, याबाबत सांगायचं आहे. हे व्हिडिओ इंग्रजीमध्ये आणि जास्तीत जास्त 180 सेकंद (3 मिनिटं) पर्यंत तयार करायचे आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही AI ची मदत देखील घेऊ शकता.
टेलिग्रामने अशा 30 फीचर्सची लिस्ट जारी केली आहे. पावेल डुरोव यांचं असं म्हणणं आहे की, हे फीचर सर्वात आधी टेलिग्रामवर लाँच करण्यात आले आणि त्यानंतर व्हॉट्सअॅपने हे फीचर्स कॉपी केले आहेत. यादीबाबत, दुरोवचा दावा आहे की ही यादी पूर्ण नाही, म्हणजेच अजूनही असे अनेक फीचर्स आहेत जे व्हॉट्सअॅपमध्ये नाहीत. या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे तर विजेत्यांची घोषणा जून महिन्यात केली जाईल.
पावेल डुरोव यांनी यापूर्वी देखील अनेकदा व्हॉट्सअॅपवर गंभीर आरोप केले आहेत. 2022 मध्ये त्यांनी असा आरोप केला होता की, व्हॉट्सअॅपमध्ये “बिल्ट-इन बॅकडोअर्स” आहेत जे यूजर्सची सुरक्षा धोक्यात आणतात. त्यांनी सांगितलं होतं की, “जर तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप असेल तर तुमच्या इतर अॅप्सचा डेटा देखील असुरक्षित आहे.” त्यानंतर दुरोव यांनी युजर्सना सल्ला दिला: “कोणतेही मेसेजिंग अॅप वापरा, पण व्हॉट्सअॅपपासून दूर राहा.”