BGMI गेमर्ससाठी आनंदाची बातमी! नवं अपडेट 3.8 अखेर आलच; Steampunk मोड, शक्तिशाली शस्त्रांसह आणखी काय असणार खास? जाणून घ्या
भारतातील करोडो लोकांचा आवडता ऑनलाईन मोबाईल गेम म्हणजे बीजीएमआय (बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया). भारतात बीजीएमआयची प्रचंड क्रेझ आहे. भारतात असे अनेक युट्यूबर्स देखील आहेत जे बीजीएमआयची लाईव्ह स्ट्रिमिंग करून पैसे कमावतात. तुम्ही बीजीएमआय प्लेअर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बीजीएमआयमध्ये आता एक नवीन अपडेट देण्यात आलं आहे. ज्यामुळे आता गेमर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक मजेदार होणार आहे.
बीजीएमआय गेम तयार करणारी कंपनी Krafton India ने BGMI चे नवीन 3.8 अपडेट जारी केले आहे. या नवीन अपडेटमुळे आता गेमर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. भारतातील प्लेअर्सना लक्षात ठेऊन हे नवीन अपडेट तयार करण्यात आलं आहे. या नवनी अपडेटमध्ये केवळ नवीन फीचर्सच नाही तर भारतासाठी खास कंटेंट आणि ब्रँड्ससह नवीन सहयोग पाहायला मिळणार आहे. Krafton ने म्हटलं आहे की, त्यांना BGMI ला लोकांचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला गेम बनवायचा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Steampunk Frontier Mode: यावेळी गेमचा अंदाज पूर्णपणे बदलणार आहे. गेममध्ये नवीन मोड्स पाहायला मिळणार आहेत. गेममध्ये तुम्हाला Steampunk Frontier हा नवीन मोड अनुभवायला मिळणार आहे. हा मोड एक फ्यूचरिस्टिक स्टीमपंक शहर Aetherholm मध्ये सेट आहे, जिथे प्लेअर्स टेक्नोलॉजी आणि एक्शनच्या जबरदस्त कॉम्बोचा अनुभव करू शकतात. हा मोड 15 मे ते 14 जुलैपर्यंत मर्यादित काळासाठी उपलब्ध असेल.
टाइटेन बॅटल– Ruined Castle मध्ये मोठे – मोठे टाइटनसोबत लढाई आणि जबरदस्त लूट.
स्लाइड रेल्स– वेगाने हालचाल करण्यासाठी आणि शत्रूंना मागे टाकण्यासाठी.
हॉट एयर बलून– हवेत शत्रूंवर हल्ला करण्यासाठी फायद्याचं ठरणार.
साइक्लोन कोस्टर– शत्रूच्या मागे लपून बसणे किंवा जलद पळून जाणे.
सीक्रेट ट्रेजर रूम– उच्च दर्जाची शस्त्रे आणि लूट.
ODM गीयर एंड जाइंट फॉर्म– Attack on Titan ऐनिमेपासून इंस्पायर्ड.
BGMI च्या वर्धापनदिनानिमत्त Anniversary Edition Crate देखील आला आहे. ज्यामध्ये UZI, GROZA, UMP45 आणि M16A4 सारख्या शस्त्रांना अपग्रेडेड वर्जन, नवीन बॅकपॅक्स, स्किन्स आणि लॉबी थीम्स दिली जाणार आहे.
Fila UAZ गाडी– आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि विश्वासार्ह.
Driver Shooting फीचर– गाडी चालवतानाही एका हाताने गोळीबार करण्याची सुविधा.
JS9 SMG- हलक्या वजनाची आणि कमी रिकोइल असलेली एक नवीन सब-मशीन गन.
Solo Arena Mode- खेळाडू आता 1v1 लढाई देखील खेळू शकतात.