Google Maps Update: किती किलोमीटरचा रस्ता सांगू शकतो गूगल मॅप? कोणत्या टेक्नोलॉजीचा केला जातो वापर? जाणून घ्या
आजच्या डिजीटल जगात गुगल मॅप आपल्या प्रवासाचा सोबती असतो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर गाडी शोधण्याआधी आपण गुगल मॅप बघतो. त्या ठिकाणी कसं जाऊ शकतो, जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कोणता रस्ता उत्तम आहे, या सर्वाची माहिती आपल्याला गुगल मॅपवरून मिळते. याशिवाय ट्रॅफिक अपडेट देखील गुगल मॅपवर दिले जातात. अगदी घरापासून ऑफीसला जाण्यासाठी किती ट्रॅफिक लागणार आहे, याची माहिती देखील गुगल मॅपद्वारे दिली जाते.
आपण अगदी मुंबईतून कोकणात जाण्याचा रस्ता देखील गुगल मॅपवर पाहू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का गुगल मॅप किती किलोमीटरपर्यंतचा रस्ता आपल्याला सांगू शकतो? यासाठी कोणत्या टेक्नोलॉजीचा वापर केला जातो? तुम्ही गुगल मॅपवर किती दूरपर्यंतचा रस्ता शोधू शकता, याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल मॅपला कोणतीही सिमा नाही. गुगल मॅप तुम्हाला लाखो किलोमीटरपर्यंतचा रस्ता अगदी सहज सांगू शकतो. पण यासाठी एक अट म्हणजे तुम्ही जे लोकेशन शोधत आहात, तिथे जाण्यासाठी रस्ता असणं आवश्यक आहे आणि तरचं गुगल मॅप तुम्हाला अगदी सहजपणे तुमच्या लोकेशनपर्यंत सोडू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही गुगल मॅपवर भारतापसून यूरोपर्यंतचा रस्ता देखील शोधू शकात. जरी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसले तरी, तांत्रिकदृष्ट्या नकाशे रस्ता दाखवू शकतात.
गुगल मॅप्समध्ये वापरल्या जाणाऱ्या टेक्नोलॉजीबद्दल जाणून घेणं, फार मनोरंजक ठरणार आहे. गुगल मॅपमध्ये अनेक लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. यातीलच एक टेक्नोलॉजी म्हणजे GPS म्हणजेच ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम. ही टेक्नोलॉजी सॅटेलाईलटच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनचं लोकेशन ट्रॅक करते आणि तुम्हाला सांगते तुम्ही कुठे आहात आणि गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे.
याशिवाय जीआईएस म्हणजे जियोग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टमचा देखील वापर केला जातो. हे सिस्टम नकाशे, रस्ते आणि स्थाने यासंबंधित बरीच माहिती डिटीटली स्टोअर करते. जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर रस्ता शोधता तेव्हा ही सिस्टम तुम्हाला फायद्याची ठरते. गुगल मॅप्स आणखी स्मार्ट आणि अपडेटेड राहावा यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा देखील वापर केला जातो. यामध्ये मशीन लर्निंगचं फार मोठं योगदान आहे.
Jio Choice Number: तुम्हालाही जिओचा खास VIP नंबर पाहिजे आहे का? मग, आताच फॉलो करा या स्टेप्स
हे तंत्रज्ञान यूजर्सचे वर्तन समजून घेते जसे की तुम्ही दररोज ऑफिसला जाण्यासाठी कोणता मार्ग वापरता, तुम्ही कुठे थांबता, कोणता मार्ग किती वाजता रिकामा असतो, गुगल या सर्व गोष्टींमधून शिकते आणि पुढच्या वेळेसाठी तुम्हाला चांगल्या सूचना देते. म्हणजेच जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन शोधता, त्यावेळी याच माहितीचा वापर केला जातो.