आवाजसोबतच डिजिटल स्क्रिनवरही दिसणार पेमेंटची रक्कम! Paytm ने दुकानदारांना दिलं मोठं गिफ्ट, डिव्हाईमध्ये ही आहे खास सेटिंग
Paytm ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. ही सेवा दुकानदारांसाठी अतिशय फायद्याची ठरणार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात जाता आणि तिथे असलेल्या स्कॅनरवर पेमेंट करता, तेव्हा तुम्ही किती रक्कम पे केली हे पेटीएमच्या साऊंडबॉक्सद्वारे दुकानदाराला कळतं. पेटीएमचा हा साऊंडबॉक्स मराठी, हिंदी, इंग्रजी अशा काही भाषांमध्ये त्याची सेवा देतो. पण आता कंपनीने हा साऊंडबॉक्स अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या साऊंडबॉक्सवर केवळ आवाजचं ऐकू येणार नाही, तर त्याच्या स्क्रिनवर अमाऊंट देखील दिसणार आहे.
Samsung च्या Ultra Slim स्मार्टफोनची लाँच डेट पुन्हा पुढे ढकलली, काय आहे याचं कारण? जाणून घ्या
जेव्हा खूप गर्दी असते, साऊंडबॉक्सचा आवाज ऐकू येत नाही, अशावेळी हे नवीन अपडेट अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. याशिवाय जर एखाद्या दुकानदाराला त्याच्या व्यवहाराची माहिती सार्वजनिक करायची नसेल, तर अशा लोकांसाठी देखील हे नवीन अपडेट केलेलं डिव्हाईस अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. महाकुंभ साउंडबॉक्स असं या डिव्हाईसला नाव देण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
दिल्लीतील स्टार्टअप महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी पेटीएमने हे नवीन डिव्हाईस लाँच केलं आहे. हे टू इन वन डिव्हाईस असणार आहे, ज्यामध्ये साऊंड आणि स्क्रीन अशा दोन्हींचा फायदा युजर्सना घेता येणार आहे. हे डिव्हाईस अशा दुकानदारांसाठी फायदेशीर ठरू शकते जे त्यांच्या व्यवहाराची माहिती सार्वजनिक करू इच्छित नाहीत. तर चला तर मग या डिव्हाईसमध्ये काय आहे आणि त्याची खासियत काय आहे याबद्दल जाणून घेऊया.
दिल्लीत स्टार्टअप महाकुंभाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात, पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी एक नवीन व्हिज्युअल डिव्हाइस लाँच केले आहे. हे डिव्हाइस मागील डिव्हाइसची अपग्रेड केलेले आवृत्ती आहे. या नवीन डिव्हाईसला महाकुंभ साउंडबॉक्स असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये ध्वनीसह डिजिटल स्क्रीन देखील आहे. जर कोणी पैसे भरले तर ती रक्कम ऑडिओसह डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. त्यामुळे जर तुम्हाला पेमेंट केलेल्या रक्कमेचा आवाज आला नाही तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.
नवीन पेटीएम महाकुंभ साउंडबॉक्स चार्ज करणे अत्यंत सोपे आहे. हे सौरऊर्जेवर चालणारे उपकरण आहे जे केवळ सौरऊर्जेनेच नव्हे तर खोलीतील प्रकाशाने देखील चार्ज केले जाऊ शकते. हे उपकरण 4G कनेक्शनने सुसज्ज आहे आणि 11 वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करते. हे त्वरित व्यवहार सूचनांसह व्यवहार ट्रॅकिंग सुविधा देखील प्रदान करेल. नवीन डिव्हाइस संपूर्ण दिवसाची पेमेंट बॅलन्स देखील दर्शवेल.
पेटीएमने लाँच केलेलं हे डिव्हाईस अशा खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरू शकते जे त्यांच्या व्यवहाराची माहिती सार्वजनिक करू इच्छित नाहीत. जर एखाद्या दुकानदाराला त्याच्या ग्राहकाचे पेमेंट लपवायचे असेल तर तो ऑडिओ बंद करू शकतो. म्हणजेच, तुम्ही या डिव्हाइसमधील ऑडिओ बंद करू शकता आणि डिस्प्लेवर कोणी किती पैसे दिले आहेत ते पाहू शकता.