फोटो सौजन्य - Social Media
तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन सेवा पुरवणाऱ्या पेटीएम मनीने रिटेल फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) ट्रेडर्ससाठी प्रगत ट्रेडिंग टूल्स सादर केली आहेत. यामध्ये ऑप्शन्स स्कॅलपर, चार्टवरून थेट ट्रेडिंग, ऑप्शन चेनमधून बास्केट ऑर्डर, पे लेटर (MTF) आणि ट्रेडिंग आयडिया यांचा समावेश आहे. ही सर्व फीचर्स Paytm Money अॅपच्या अँड्रॉइड आणि iOS च्या नवीन आवृत्तीत F&O विभागात F&O अॅक्टिवेशन व धोके प्रकटीकरण पूर्ण केल्यानंतर वापरता येतील.
पेटीएम मनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आम्ही प्रत्येक गुंतवणूकदार व ट्रेडरला उच्च दर्जाच्या साधनांच्या माध्यमातून अधिक चांगले निर्णय घेता यावेत यासाठी कटिबद्ध आहोत. एफ अँड ओमध्ये वाढती रिटेल सहभागिता पाहता, ही टूल्स अधिक प्रभावी ठरतील.”
पेटीएम मनीने रिटेल F&O ट्रेडर्ससाठी सादर केलेल्या नव्या सुविधांमध्ये अनेक प्रगत टूल्सचा समावेश आहे. ऑप्शन्स स्कॅलपर हे टूल एकाच वेळी ऑप्शनचा चार्ट आणि मूळ स्टॉक दाखवते, ज्यामुळे व्यापारी पूर्वनिर्धारित ऑर्डर साइज आणि प्रकार सेट करून एका टॅपवर व्यवहार करू शकतात. चार्टवरून थेट ट्रेडिंग हे ChartIQ आधारित फीचर वापरकर्त्यांना चार्टवरूनच थेट ऑर्डर टाकण्याची सुविधा देते. यामध्ये किंमत स्लायडरद्वारे ठरवून ती ऑर्डर लगेच एक्सचेंजकडे पाठवली जाते. ऑप्शन चेनमधून बास्केट ऑर्डर या वैशिष्ट्यामुळे व्यापारी एकाच वेळी अनेक स्ट्राइक प्राईस निवडून बास्केट तयार करू शकतात व ती पुन्हा वापरू शकतात, त्यामुळे वेळ आणि मेहनत वाचते.
ट्रेडिंग आयडिया या फीचरमध्ये सेबी नोंदणीकृत विश्लेषकांकडून मिळणारे धोरणाधारित मार्गदर्शन सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याशिवाय, पे लेटर सुविधा अंतर्गत सक्रिय ट्रेडर्ससाठी केवळ 9.75% वार्षिक दराने मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (MTF) देखील देण्यात आली आहे. ही सर्व टूल्स ट्रेडिंगचा अनुभव अधिक सुलभ, वेगवान आणि माहितीपूर्ण बनवण्यास मदत करतात.
पेटीएम मनीचे हे नविन फिचर्स रिटेल ट्रेडर्सना अधिक सशक्त बनवून गुंतवणुकीचा अनुभव पारदर्शक, जलद व माहितीपूर्ण बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील.