स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागलात? ही एक सेटिंग कायमची मिटवेल तुमची चिंता, फोनही होणार सुपरफास्ट!
स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण दिवसभर आपल्या विविध कामांसाठी स्मार्टफोनचा वापर करतो. आपला एकही दिवस स्मार्टफोनशिवाय जाऊ शकत नाही. स्मार्टफोनमध्ये येणारे नवीन फिचर्स आणि अपडेट्स युजर्सना नवीन अनुभव देतात. नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स यूजरसाठी अत्यंत महत्वाचं असते. कारण नवीन अपडेट मिळाल्यानंतर युजरचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून जातो. स्मार्टफोन व्यवस्थित काम करण्यासाठी त्याला वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स अत्यंत गरजेचं आहे.
सॉफ्टवेअर अपडेट्सनंतर फोनला नवीन फीचर्स, सिक्योरिटी आणि अधिक चांगलं परफॉर्मन्स मिळतो. पण वेळोवेळी स्मार्टफोनला नवीन अपडेट आला आहे का हे चेक करणे अत्यंत कंटाळवाण काम आहे. तुम्हीही स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी ऑटोमेटिक अपडेट (Automatic Update) देखील सेट करू शकता. पण यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. या बदलांनंतर तुम्हाला मॅन्युअली स्मार्टफोनचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज भासणार नाही. या सेटिंगच्या मदतीने मोबाईल, लॅपटॉप किंवा डिव्हाईसचे सॉफ्टवेअर मॅन्युअली अपडेट कटण्याची कटकट संपणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक अॅप्स आणि सॉफ्टवेअरमध्ये Settings > Update किंवा General Settings मध्ये जाऊन Automatic Updates चा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा ऑप्शन ऑन करा. आता तुमचे डिव्हाईस वेळोवेळी अपडेट होईल आणि नवीन सॉफ्टवेअर इंस्टॉल करेल.
जर तुमच्या डिव्हाईसमध्ये अनेक अॅप्स असतील तर तुम्ही Update Manager Tools चा वापर करू शकता. हे टूल तुमच्या सिस्टममध्ये इंस्टॉल सर्व अॅप्स स्कॅन करतील आणि अपडेट मॅनेज करतील. तुमची इच्छा असेल तर तुम्ही अपडेट शेड्यूल देखील करू शकता.
काम किंवा गेमिंगदरम्यान अपडेट आल्यास वैताग येतो. यावरील उपाय म्हणजेच तुम्ही रात्री किंवा डिव्हाइस वापरात नसताना अपडेट शेड्यूल करू शकता. यामुळे तुमच्या कामात व्यत्यय येणार नाही आणि सॉफ्टवेअर देखील अपडेट राहील.
जर डिव्हाइसमध्ये पुरेशी स्टोरेज नसेल, तर अपडेट पूर्ण करता येणार नाही. म्हणून प्रत्येक नवीन अपडेटसाठी जागा मोकळी करण्यासाठी वेळोवेळी अनावश्यक फाइल्स डिलीट करत रहा.
ऑटोमॅटिक अपडेट्ससाठी जलद आणि स्टेबल इंटरनेट आवश्यक आहे. जर कनेक्शन कमकुवत असेल तर अपडेट्स इन्स्टॉल करण्यात समस्या येऊ शकतात. म्हणून वाय-फाय कनेक्शनची स्थिती तपासत रहा.