YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज
आजच्या डिजीटल काळात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube केवळ एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म नाही तर कमाईचे साधन बनले आहे. सध्या अनेकजण YouTube मध्ये त्यांचे करिअर बनवतात, ज्यांना YouTuber म्हणतात. YouTube वर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ व्हायरल होतात, तर काही व्हिडीओंना जास्त व्ह्युज देखील मिळत नाहीत. पण युट्युबवर व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण केवळ व्हिडीओमधील कंटेट असतो का? तर नाही. युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्याची वेळ देखील अत्यंत महत्त्वाची असते. या वेळेमुळे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Father’s Day 2025: आपल्या बाबांना गिफ्ट करा हे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स, किंमत 25,000 हून कमी
तुम्ही देखील युट्यूबर असाल आणि युट्यूबवर तुमचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही युट्यूबवर व्हिडीओ तर अपलोड करताय पण व्हिडीओला व्ह्युज मिळत नाही, युट्यूब चॅनेल ग्रो होत नाही. ही तुमची देखील समस्या आहे का? तर आता आम्ही तुम्हाला युट्यूबवरील वेळेचं गणित सांगणार आहोत. युट्यूबवर व्हिडीओ व्हायरल होण्यामागे केवळ कंटेटच नाही तर वेळ देखील एक महत्त्वाचं कारण आहे.
युट्यूबवर जेव्हा व्हिडीओ अपलोड केला जातो, तेव्हा सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. यावेळी जर लोकांनी तुमचा व्हिडीओ लाईक आण कमेंट केली, तर यूट्यूब एल्गोरिदम तो व्हिडीओ प्रमोट करतो. हे व्हायरल होण्याची पहिली पायरी आहे.
जगभरातील यूट्यूब एक्सपर्ट्स आणि डेटा एनालिस्ट्सच्या रिपोर्टनुसार, सोमवार ते शुक्रवार आणि वीकेंड (शनिवार, रविवार) या दिवशी वेगवेगळे टाईम व्हिडीओ अपलोड करण्यासाठी योग्य असतात.
दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, ऑफीस आणि शाळेनंतर लोकं फ्री होतात आणि यूट्यूब ब्राउज करतात. संध्याकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत, हा सर्वात पॉपुलर टाईम आहे, जेव्हा सर्वाधिक लोकं YouTube वर अॅक्टिव्ह असतात.
सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत – लोक आठवड्याच्या शेवटी उशिरा उठतात आणि त्यांच्या मोकळ्या वेळेत YouTube पाहतात. संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत – वीकेंड एंटरटेनमेंट पीक टाईम आहे.
सध्याच्या काळात 70% हून अधिक YouTube व्यूज मोबाईलद्वारे येतात. म्हणून जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता तेव्हा लोकांची मोबाईल अॅक्सेसिबिलिटी आणि त्यांचा मोकळा वेळ लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ऑफिस लंच टाइम (दुपारी 1 ते 2) आणि प्रवास टाइम (सायंकाळी 5 ते 7) हे देखील युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी योग्य वेळ आहे.