
Apple च्या 'या' iPhone वर मिळतोय 10 हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट; कुठे आहे बेस्ट ऑफर? बातमी वाचाच...
Apple चा आयफोन 16e वर मिळतेय खास सूट
आयफोन घेणाऱ्यांसाठी सुरू आहे खास ऑफर
आधुनिक फीचर्ससह येतो आयफोन 16e
Apple सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन आयफोन घेऊन येत असते. आयफोन खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते असे समजले जाते. दरम्यान आता तुम्हाला आयफोन स्वस्त किमतीत खरेदी करता येणार आहे. आयफोन 16e वर तुम्हाला भरघोस सूट मिळणार आहे. या फोनवर काय ऑफर असणार आहे आणि यामधले फीचर्स काय आहे ते जाणून घेऊयात.
आयफोन 16e वर तुम्हाला भरघोस सूट मिळणार आहे. या फोनवर तुम्हाला 10 हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीने हा आयफोन फेब्रवारी महिन्यात लॉंच केला होता. amazon वर हा फोन अनेक ऑफर्समध्ये मिळत आहे. विविध क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला अधिक सूट मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे ऑफर?
आयफोन 16e वर खास ऑफर आहे. यावर तुम्हाला 10 हजारपेक्षा जास्तीची सूट मिळू शकते. हा फोन फेब्रुवारीमध्ये 59,900 रुपयांमध्ये लॉंच करण्यात आला होता. आता हा फोन amazon वर 51,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्डने पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. आता या फोनची किंमत 49,499 रुपये होईल. त्यावर एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 47,700 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
Apple iPhone 16e स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. यासोबतच कंपनीने त्यात फेस आयडी सिस्टम दिली आहे. यासोबतच, कंपनीने म्यूट बटणाच्या जागी अॅक्शन बटण आणले आहे. कंपनीने या आयफोनमध्ये USB-C पोर्ट दिला आहे. या परवडणाऱ्या आयफोन मॉडेलमध्ये नवीनतम A18 चिप आहे.
अॅपलने त्यांच्या रॅमची माहिती शेअर केलेली नाही. तथापि, बेंचमार्क चाचण्यांवरून असे दिसून येते की यात 8 जीबी रॅम असू शकते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 16e मध्ये 48MP फ्यूजन रियर कॅमेरा आहे, जो 2x डिजिटल झूम, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि HDR ला सपोर्ट करतो. यासोबतच, समोर 12 एमपीचा ट्रूडेपथ कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. हे मॉडेल 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करते.