Apple iOS Update: Apple च्या नवीन अपडेटमध्ये मिळालं Priority Notifications आणि अनेक कमाल AI फीचर्स, अशी करा सेटिंग
Apple ने त्यांच्या आयफोन युजर्ससाठी iOS 18.4 चे पहिले बीटा अपडेट जारी केले आहे. या अपडेटमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI फीचर्सचा देखील समावेश आहे. iOS 18.4 च्या पहिल्या बीटा अपडेटमधील सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे प्रायोरिटी नोटिफिकेशन्स. कंपनीने त्यांच्या नवीन अपडेटमध्ये युजर्ससाठी प्रायोरिटी नोटिफिकेशन्स नावाचं एक खास फीचर दिलं आहे.
Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन
प्रायोरिटी नोटिफिकेशन्स फीचर एडवांस्ड इंटेलिजेंसच्या मदतीने युजर्सना महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी सेंड करतो. याच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे महत्त्वाचे अलर्ट सहज पाहू शकतात. प्रायोरिटी नोटिफिकेशन्स युजर्सना त्यांच्या अनेक महत्त्वाच्या कामांत मदत करणार आहे. पण प्रायोरिटी नोटिफिकेशन्स नक्की आहे काय, ते कशा प्रकारे सुरु केलं जाऊ शकतं आणि आयफोनच्या या नवीन अपडेट्समधील इतर फीचर्स कोणते आहेत, याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रायोरिटी नोटिफिकेशन्स वैशिष्ट्य कोणत्या नोटिफिकेशन्स सर्वात महत्त्वाच्या आहेत हे ठरवण्यासाठी डिव्हाइसवरील एडवांस्ड इंटेलिजेंस वापरते. हे फीचर लॉक स्क्रीनवर एका वेगळ्या विभागात या नोटिफिकेशन्स सेंड करते जेणेकरून युजर्स त्वरित महत्त्वाचे अलर्ट पाहू शकतील.
एकदा तुम्ही प्रायोरिटी नोटिफिकेशन्स चालू केले की, महत्त्वाच्या सूचना तुमच्या आयफोनच्या लॉक स्क्रीनवर स्वतंत्रपणे दिसतील, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे अपडेट चुकवणार नाही याची खात्री होईल.
नव्या भाषांना सपोर्ट – iOS 18.4 आता फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, जपानी, कोरियन आणि चिनी यासह 10 नवीन भाषांना समर्थन देते.
अॅपल इंटेलिजेंस अपग्रेड – अपडेटमध्ये AI तंत्रज्ञान अधिक सुधारित करण्यात आले आहे, ज्यामुळे iPhone युजर्सचा अनुभव आणखी सहज होईल.
सुधारित परफॉर्मेंस आणि सिक्योरिटी – सिस्टम अधिक सुरक्षित आणि जलद बनवण्यासाठी अॅपलने अनेक किरकोळ सुधारणा केल्या आहेत.
Ambient Music – iOS 18.4 Beta मध्ये कंपनीने Ambient Music फीचर देखील अॅड केलं आहे. या फीचरमध्ये 4 वेगवेगळे मोड्स आहेत, ज्यामध्ये Sleep, Chill, Productivity, आणि Wellbeing यांचा समावेश आहे.
Image Playground मध्ये नवीन स्केच स्टाइल – iOS 18.4 बीटा मध्ये, कंपनीने इमेज प्लेग्राउंडसाठी नवीन स्केच स्टाइल जोडली आहे. हे फीचर अशा युजर्ससाठी आहे ज्यांना ॲनिमेशन आणि स्केच यांसारख्या कार्यात रस आहे. ही नवीन शैली युजर्ससाठी ग्राफिक डिझाईन, डिजिटल आर्ट आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट तयार करण्यात खूप उपयुक्त ठरेल.