
फोटो सौजन्य - Social Media
सर्वात मोठा फरक म्हणजे गुणवत्तेचा असतो. मूळ Apple उत्पादनांमध्ये उच्च दर्जाचे मटेरियल, मजबूत बॉडी आणि अचूक फिनिशिंग असते. तर फर्स्ट कॉपी उत्पादनांमध्ये बाहेरून लूक जवळपास सारखा दिसला तरी मटेरियलची गुणवत्ता कमी असते. काही काळ वापरल्यानंतर त्यावर ओरखडे पडणे, रंग उडणे किंवा बटण व्यवस्थित काम न करणे यांसारख्या समस्या दिसू शकतात.
तसेच सॉफ्टवेअर आणि फीचर्समध्येही मोठा फरक असतो. उदाहरणार्थ Apple Watch, AirPods किंवा iPhone यांची फर्स्ट कॉपी बाजारात सहज मिळते. मात्र या डिव्हाइसेसमध्ये मूळ iOS किंवा Apple चे अधिकृत सॉफ्टवेअर नसते. त्यामुळे अनेक प्रीमियम फीचर्स काम करत नाहीत किंवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात.
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही फर्स्ट कॉपी प्रोडक्ट्स धोकादायक ठरू शकतात. स्वस्त बॅटरी आणि निकृष्ट इलेक्ट्रॉनिक घटक वापरल्यामुळे डिव्हाइस गरम होणे, लवकर बंद पडणे किंवा काही वेळा बॅटरी फुटण्यासारखे प्रकारही घडू शकतात. याशिवाय अशा उत्पादनांवर कोणतीही अधिकृत वॉरंटी किंवा सर्व्हिस मिळत नाही.
अनेकदा ग्राहकांना मूळ आणि बनावट उत्पादनातील फरक लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे खरेदी करताना अधिकृत स्टोअर, विश्वसनीय विक्रेते किंवा कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ यांच्यामार्फतच प्रोडक्ट घेणे अधिक सुरक्षित मानले जाते. थोडे स्वस्त मिळत असल्याच्या मोहात फर्स्ट कॉपी प्रोडक्ट घेण्यापेक्षा मूळ उत्पादन घेणेच अधिक फायदेशीर ठरते.