Perplexity CEO ने iPhone वापरकर्त्यांना दिला महत्वाचा इशारा
आजच्या युगात iPhone म्हणजे एक फोन न राहता एक स्टेटस सिम्बॉल म्हणजेच प्रतिष्ठेचे चिन्ह बनले आहे. म्हणूनच तर आज अनेक जण खास करून तरुण पिढी आयफोन खरेदी करत असतात. त्यात EMI च्या ऑप्शनमुळे असे महागडे फोन खरेदी करणे अजूनच सोपे झाले आहे. आयफोन ओळखला जातो तो त्याच्या दमदार कॅमेरा क्वालिटी आणि उत्तम सुरक्षिततेसाठी. मात्र, आता Perplexity च्या CEO ने आयफोन वापरकर्त्यांना सावध केले आहे.
AI स्टार्टअप Perplexity चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी आयफोन वापरकर्त्यांना इशारा दिला आहे. त्यांनी त्यांना अॅपल अॅप स्टोअरवर सूचीबद्ध असलेले कॉमेट अॅप डाउनलोड करू नका असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की सध्या अॅप स्टोअरवर सूचीबद्ध असलेले अॅप बनावट आणि स्पॅम आहे आणि ते कोणत्याही प्रकारे पर्प्लेक्सिटीशी जोडलेले नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वीच कॉमेट ब्राउझर लाँच केला होता. मात्र, ते अद्याप आयफोन वापरकर्त्यांसाठी रोल आउट केलेले नाही.
श्रीनिवास यांनी सांगितले की, कॉमेट अद्याप iOS साठी रिलीज झालेला नाही. सध्या ॲप स्टोअरवर सूचीबद्ध असलेले ॲप बनावट आणि स्पॅम आहे. कॉमेट iOS साठी रिलीज झाल्यावर कंपनी माहिती देईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पर्प्लेक्सिटीच्या सीईओचा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा हे ॲप अँड्रॉइडवर मोठ्या प्रमाणात डाउनलोड केले जात आहे आणि आयफोनसाठी त्याची मागणी देखील वाढली आहे. पर्प्लेक्सिटी कॉमेट ब्राउझरला आयफोनवरील सफारीचा पहिला खरा स्पर्धक म्हणूनही ओळखले जात आहे.
परप्लेक्सिटीचा एआय-पॉवेर्द कॉमेट ब्राउझर काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला होता आणि लाँच झाल्यानंतर लगेचच सर्व वापरकर्त्यांसाठी तो मोफत करण्यात आला. क्रोमियम फ्रेमवर्कवर बनवलेला हा ब्राउझर गुगल ब्राउझरला कठीण स्पर्धा देतोय. हे केवळ लोकप्रिय एक्सटेंशन आणि बुकमार्कना समर्थन देत नाही तर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि संशोधन सुलभ करण्यासाठी अनेक बुद्धिमान साधने देखील देते. ते लॉंग कंटेंटचा सारांश तयार करण्यास, वर्कफ्लो व्यवस्थापित करण्यास आणि टास्क ऑटोमॅट करण्यास सक्षम आहे. सुरुवातीला, याचे Paid Version लाँच करण्यात आले होते, परंतु आता सर्व प्रीमियम फीचर्स विनामूल्य करण्यात आले आहेत.