संपता संपणार नाही बॅटरी, Realme ने सादर केला नवीन कॉन्सेप्ट फोन; बॅक-टू-बॅक पहा 25 चित्रपट
Realme ने बुधवारी चीनमध्ये 828 Fan Festival आयोजित केला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने दोन नवीन कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केले आहेत. यामधील एका स्मार्टफोनमध्ये 15,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी तब्बल 50 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम ऑफर करते आणि हे इतर डिव्हाईसना रिव्हर्स चार्ज देखील करू शकते. दुसरा चिल फॅन फोन इनबिल्ट फॅनसह येतो, जो जास्त गेमिंग दरम्यान फोन थंड ठेवण्यास मदत करतो.
iPhone 17 Air की iPhone 17 Slim? कोणत्या नावाने लाँच केला जाणार Apple चा सर्वात पातळ iPhone?
Realme 828 Fan Festival लाइवस्ट्रीम दरम्यान कंपनीने 15,000mAh बॅटरीवाला स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनला एक पोर्टेबल पावर स्टेशन सांगण्यात आलं आहे. ज्याचा वापर वायर्ड कनेक्शनद्वारे स्मार्टफोन आणि वेअरेबल्स सारख्या इतर डिव्हाईसना चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो. Realme चे वाइस प्रेसिडेंट Chase Xu यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फोनच्या एका चार्जवर युजर्स सलग 25 चित्रपट पाहू शकतात. एकदा चार्ज केल्यावर, हा कॉन्सेप्ट फोन 18 तासांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग, 30 तासांपर्यंत गेमिंग, 6 दिवसांपर्यंत सामान्य वापर आणि फ्लाइट मोडमध्ये 3 महिन्यांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)
या स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. मात्र सोशल मीडियावर या फोनबाबत सांगण्यात आलं आहे की, हा फोन Android 15 बेस्ड Realme UI 6.0 वर आधारित आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच असं सांगितलं जात आहे की, यामध्ये उपलब्ध व्हर्च्युअल रॅम विस्तार वापरून हे आणखी 12GB ने वाढवता येते.
फोन मॉडेल नंबर PKP110 सह स्पॉट करण्यात आला आहे. Realme कॉन्सेप्ट फोनचा अबाउट पेजवर 6.7-इंचाच्या डिस्प्लेचाही उल्लेख आहे. टीझर इमेजमधून असे दिसून आले आहे की फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे आणि तो सिल्व्हर कलरमध्ये दिसत आहे, ज्याच्या बॅक पॅनलवर 15,000mAh ब्रँडिंग लिहिलेले आहे.
Realme Chill Fan फोनला त्याच्या इनबिल्ट कूलिंग फॅनमुळे हे नाव देण्यात आले आहे. कंपनीने तो ‘इनबिल्ट एसी इनसाइड’ म्हणून सादर केला आहे. टीझर व्हिडिओमध्ये फोनच्या डाव्या फ्रेमवर एक व्हेंट ग्रिल दाखवण्यात आली आहे, ज्यामधून हवा बाहेर येते. Realme च्या वाइस प्रेसिडेंटच्या मते, ही कूलिंग सिस्टम फोनचे तापमान 6 अंश सेल्सिअसने कमी करते.
स्मार्टफोनच्या डिझाईनबाबत बोलायचं झालं तर, यात Realme GT 7T सारखाच कॅमेरा युनिट देण्यात आला आहे. हा फोन निळ्या रंगात दिसतो, जो IcySense ब्लू शेडपेक्षा थोडा जास्त सॅचुरेटेड आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे दोन्ही फोन कॉन्सेप्ट मॉडेल आहेत, जे Realme च्या R&D प्रोग्रेस दर्शविण्यासाठी सादर केले गेले आहेत. सध्या, बाजारात त्यांच्या लाँचिंगबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.