व्वा, डिझाइन तर लयभारी! AI फिचर्स आणि हटके लूकसह Realme Air Buds ची एंट्री, 48 तासांपर्यंत चालणार बॅटरी
टेक कंपनी Realme ने नुकतीच नवीन स्मार्टफोन सिरीज Realme GT 7 भारतात लाँच केली आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनीने Realme GT 7, Realme GT 7T आणि Realme GT 7 Dream Edition हे तीन डिव्हाईस लाँच केले आहेत. या स्मार्टफोन सिरीजसोबत कंपनीने आणखी एक गॅझेट लाँच केलं आहे. हे गॅझेट म्हणजे नवीन आणि क्लासी लूकवाले एअरबड्स. स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगसोबतच कंपनीने Realme Buds Air 7 Pro TWS ईयरफोन्स देखील भारतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत.
Realme GT 7 सीरीज भारतात लाँच! दमदार Features आणि पवारफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
नवीन एअरबड्समध्ये सिंगल चार्जवर केससह 48 तास चालणारी बॅटरी देण्यात आली आहे. ईयरफोन्स 53dB अॅक्टिव नॉइस कँसलेशन (ANC) आणि 45ms लो लेटेंसी मोडला सपोर्ट करतात. Buds Air 7 Pro मध्ये AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI Live Translator, Face to Face Translator आणि AI Inquiry यांचा समावेश आहे. हे एअरबड्स एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. एअरबड्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Realme)
Realme Buds Air 7 Pro एअरबड्स भारतात 5,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हे फियरी रेड, ग्लोरी बेज, मेटैलिक ग्रे आणि रेसिंग ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. एअरबड्स ऑफिशियल ई-स्टोर, Amazon, Flipkart, Myntra आणि काही ऑफलाइन रिटेल स्टोर्सद्वारे खरेदी केले जाऊ शकतात.
Realme buds air 7 Pro launched in India and Europe.
Price 💰 ₹5,499, €139Specifications
– 11mm + 6mm drivers
– 53dB noise cancellation
– LHDC 5.0
– Hi-res audio
– Dual pairing 2.0
– IP55 rating
– 3D spatial audio
– 45ms latency
– Bluetooth version 5.4
– 530mAh battery case… pic.twitter.com/7KDDZpfGQK— Abhishek Yadav (@yabhishekhd) May 27, 2025
Realme Buds Air 7 Pro मध्ये ट्रेडिशनल इन-ईयर डिझाइन आहे आणि यामध्ये 11mm आणि 6mm डुअल-डॅक ड्राइवर सेटअप दिला आहे. या एअरबड्समध्ये सिक्स-माइक AI-बॅक्ड नॉइस कँसलेशन सिस्टम देखील आहे आणि हे 53dB ANC ला सपोर्ट करतात.
Realme Buds Air 7 Pro मध्ये Hi-Res Audio Wireless सर्टिफिकेशन आणि LHDC ऑडियो कोडेक सपोर्ट आहे. TWS इयरफोन्समध्ये Swift Pair, Bluetooth 5.4 आणि डुअल डिवाइस कनेक्टिविटी देण्यात आली आहे. हे 45ms लो लेटेंसीला सपोर्ट करते, जो ऑडियो-व्हिज्युअल लॅग कमी करण्यसाठी मदत करते. या नवीन ईयरफोन्समध्ये IP55 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंस रेटिंग दिली आहे. नवीन Realme Buds Air 7 Pro मध्ये AI फीचर्स जसे की AI Live Translator देण्यात आला आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स Gemini AI व्हॉईस असिस्टेंटद्वारे लाइव ट्रांसलेशनचा अनुभव घेऊ शकतात. Face to Face ट्रांसलेटर फीचर रियल-टाइम संभाषण ट्रांसलेशन आणि व्हॉईस ब्रॉडकास्टिंगची सुविधा देते. तर AI Inquiry टूल Google Gemini अॅक्सेससाठी परवानगी देतो.
Realme Buds Air 7 Pro केससह सिंगल चार्जवर 48 तासांपर्यंत चालतात. तर LHDC सह टोटल प्लेबॅक टाइम 28 तासांचा होतो. 10 मिनिटे क्विक चार्ज केल्याने 11 तासांचा वापर होतो. चार्जिंग केसमध्ये USB टाइप-सी पोर्ट आहे. याचे वजन अंदाजे 4.89 ग्रॅम आहे. प्रत्येक इअरफोनचे वजन अंदाजे 4.89 ग्रॅम आहे.