
कमी किंमत, जबरदस्त आवाज! Xiaomi चे नवे ईयरबड्स लाँच, 35 तासांची दमदार बॅटरी आणि Harman-ट्यून्ड ऑडिओची धमाल
Xiaomi Buds 6 एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसची किंमत CNY 699 म्हणजेच सुमारे 8,935 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस मून शॅडो ब्लॅक, पर्ल व्हाइट, टाइटेनियम गोल्ड आणि नेबुला पर्पल (चीनमधून भाषांतर) कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. नवीन Xiaomi Buds 6 चीनमध्ये Xiaomi ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi Buds 6 मध्ये Harman-ट्यून्ड ‘गोल्डन ईयर’ (चीनमधून भाषांतर) ऑडियो आणि इक्वलाइजर आहे. हे नवीन TWS एडॅप्टिव नॉइज कँसलेशन (ANC) सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. याची फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स रेट 16Hz ते 40,000Hz आहे. Xiaomi च्या Buds 6 चा फॉर्म फॅक्टर सेमी-इन-ईयर आहे. ईयरबड्सचे वजन सुमारे 4.4g आहे. तर चार्जिंग केसचे वजन सुमारे 35.4g आहे. डायमेंशनबद्दल बोलायचं झालं तर ईयरबड्सचा आकार 31.77×17.17×20.56mm आहे आणि केसचा आकार 52.34×52.57x24mm आहे. ईअरबड्स एएसी, एसबीसी, एपीटीएक्स लॉसलेस, एपीटीएक्स एडॅप्टिव आणि LC3 कोडेकला सपोर्ट करतात.
Xiaomi Buds 6 मध्ये ब्लूटूथ 5.4 सपोर्ट देखील देण्यात आला आहे, जो 10m ची रेंज ऑफर करतो. कंपनीने दावा केला आहे की, Xiaomi Buds 6 मध्ये धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. प्रत्येक ईयरबडमध्ये 35mAh बॅटरी आहे, तर चार्जिंग केसमध्ये 475mAh बॅटरी आहे. टेक फर्मने असा दावा केला आहे की, ANC बंद असल्यास ईयरबड्स 6 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतात आणि चार्जिंग केससह एकून 35 तासांचा बॅटरी बॅकअप दिला जातो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ANC चालू केल्याने, इअरबड्स 3.5 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतील आणि केससह एकूण 20 तासांचा बॅकअप दिला जातो.
Ans: Android आधारित HyperOS/MIUI वर चालतात.
Ans: Redmi आणि POCO हे दोन्ही Xiaomi चे सब-ब्रँड आहेत.
Ans: हो, बहुतांश Xiaomi फोन भारतातच बनवले जातात.