Reliance Jio करतोय मोठी प्लॅनिंग! अल्ट्रा-हाई स्पीड इंटरनेट सर्विससाठी सुरू आहेत प्रयत्न, युजर्सना कसा होणार फायदा?
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असणाऱ्या रिलायन्स जिओमध्ये आता मोठी प्लॅनिंग सुरु झाली आहे. जिओचा इंटरनेट अधिक वेगाने कसा सुरु होईल, यासाठी ही प्लॅनिंग केली जात आहे. मिळालेल्या कंपनी सध्या अल्ट्रा-हाय स्पीड इंटरनेट सर्विससाठी प्रयत्न करत आहे. कंपनी त्यांच्या वायफाय सेवांचा विस्तार करण्यासाठी 26 गीगाहर्ट्स बँडमध्ये रेडियो लहरी (स्पेक्ट्रम) चा वापर करता यावा आणि यासाठी टेलीकॉम डिपार्टमेंट (DoT) कडून परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे.
टेलीकॉम डिपार्टमेंटकडून परवानगी देण्यात यावी, याासाठी कंपनीने गेल्या आठवड्यात त्यांना संपर्क देखील साधला होता. मात्र अद्याप DoT कडून जिओने पाठवलेल्या ईमेलला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. टेलीकॉम अॅक्टनुसार, 2022 च्या लिलावावेळी बोली दस्तऐवजमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की, जर कोणतीही कंपनी 5G साठी वाटप केलेल्या स्पेक्ट्रमचा वापर कोणत्या दुसऱ्या टेक्नोलॉजीसाठी करणार असेल तर त्यापूर्वी कंपनीला या कामासाठी मंजूरी घेणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नोटिस इनवाइटिंग एप्लीकेशन (NIA) नुसार, कोणतीही वेगळी टेक्नोलॉजी लागू करण्यासाठी कमीत कमी सहा महिन्यांआधी याबाबत माहिती देणं आवश्यक आहे. जर टेलिकॉम कंपन्यांना कोणत्याही नवीन कामासाठी बँडचा वापर करायचा असेल तर त्यांना 6 महिने आधीच अर्ज करावा लागेल. सध्या जिओने टेलीकॉम डिपार्टमेंटला दिलेल्या अर्जाबाबत कोणीतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जर देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओला टेलीकॉम डिपार्टमेंटने परवानगी दिली तर एयरटेल देखील यासाठी अर्ज करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साधारणपणे टेलिकॉम कंपन्या 5GHz बँडवर वाय-फाय आधारित ब्रॉडबँड सेवा देतात. तर 26GHz बँड आणि 3300MHz आवृत्तिला 5G मोबाईल नेटवर्कसाठी रिजर्व केलं जातं. मात्र आता समोर आलेल्या अहवालानुसार, जियो Wi-Fi में 5G सेवासाठी 26GHz बँडचा वापर करून एक मोठा प्रोजेक्ट सुरु करू शकतो. याद्वारे, कंपनी शहरांमधील जास्त लोकसंख्या असलेल्या भागात यूजर्सना हाय स्पीड ब्रॉडबँड सेवा देऊ शकते. यासोबतच, कंपनी 5GHz बँडच्या अल्ट्रा-हाय स्पीड कव्हरेजची क्षमता आणखी सुधारण्याची योजना आखत आहे. म्हणजेच कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा युजर्सना देखील होणार आहे.
जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. भारतात जिओचे करोडो युजर्स आहेत. प्रत्येक 10 पैकी 8 जण तुम्हाला जिओचा वापर करत असल्याचे पाहायला मिळतील. जिओ त्यांच्या युजर्सना सर्वात चांगल्या सेवा देण्यासाठी ओळखले जातो. जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील ओटीटी फायदे आणि 5G नेटवर्कची सुविधा ऑफर केली जाते. आता देखील जिओने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सवर नक्कीच परिणाम होणार आहे. टेलिकॉम डिपार्टमेंट जिओला परवानगी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.