फोटो सौजन्य - cseed
तुम्ही कधी फोल्डिंग टीव्ही बघितला आहे का? एक असा स्मार्ट टिव्ही जो 25 सेकंदात फोल्ड होतो आणि 60 सेकंदात उघडतो. ऐकूण आर्श्चर्य वाटलं ना! पण बाजारात असा टिव्ही खरंच उपलब्ध आहे जो फोल्ड होऊ शकतो आणि हा टिव्ही फोल्ड झाल्यानंतर तो एखाद्या टेबलाप्रमाणे दिसतो. CES 2024 मध्ये C Seed ने जगातील पहिला फोल्डिंग N1 टीव्ही लाँच केला आहे. या फोल्डींग टिव्हीची किंमत तब्बल 12 कोटी रुपये आहे. टिव्हीची किंमत ऐकूण नक्कीच प्रत्येकाला धक्का बसेल. पण या टिव्हीचे फीचर्स ऐकूण सर्वजण थक्क होतील.
नुकताच लॉस वेगासमध्ये एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये सॅमसंगने ट्रान्सपरंट MicroLED आणि एलजीने OLED TV लाँच केले. हे सर्वात मोठ्या स्क्रीनचे ट्रान्सपरंट टीव्ही आहेत. पण C Seed च्या फोल्डिंग N1 टीव्हीने सॅमसंगच्या ट्रान्सपरंट MicroLED आणि एलजीचा OLED TV या सर्वांत मोठ्या स्क्रीनच्या ट्रान्सपरंट टीव्हीला देखील मागे टाकलं आहे. चला तर मग फोल्डिंग N1 टीव्हीच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
C Seed ने लाँच केलेल्या जगातील पहिल्या फोल्डिंग N1 टीव्हीमध्ये 4K मायक्रोएलईडी डिस्प्ले आहे. हा टिव्ही 137 इंचाचा आहे. टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्ट आहे.यात 16-बिट कलर प्रोसेसिंग आहे. टीव्हीवरील व्ह्यूविंग एक्सपिरिअंस अधिक उत्तम व्हावा यासाठी 4,000 nits पर्यंत ब्राइटनेस आहे.
टीव्ही डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करतो. हा Android TV 13 सिस्टीमवर चालतो. यात फुल कंट्रोल सिस्टीम, अडाप्टिव्ह गॅप कॅलिब्रेशन आणि 180 डिग्री रोटेशन ऑडिओ आहे. कंपनीने यामध्ये 100W स्पीकर बसवले आहेत. माहितीनुसार, त्यांचा आवाज आउटपुट रेंज 60Hz ते 22kHz दरम्यान आहे. एवढेच नाही तर साउंड सिस्टीम सुधारण्यासाठी तुम्ही टीव्हीला एक्स्ट्रा स्पीकर देखील कनेक्ट करू शकता.
C Seed ने लाँच केलेल्या जगातील पहिल्या फोल्डिंग N1 टीव्ही 25 सेकंदात फोल्ड होतो आणि 60 सेकंदात उघडतो. टीव्हीचा वापर फर्निचर म्हणूनही केला जाऊ शकतो. हा स्मार्ट टीव्ही 165, 137 आणि 103 इंच या तीन आकारात उपलब्ध आहे. हा टीव्ही गोल्ड, सिल्व्हर, ब्लॅक आणि टायटॅनियम रंगांमध्ये येतो. C SEED N1 टीव्ही एक अल्ट्रा प्रीमियम टेलिव्हिजन आहे. याची आवाजाची गुणवत्ताही उत्कृष्ट आहे. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी यात पाच एचडीएमआय आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत.
या टीव्हीची किंमत सुमारे 184,200 डॉलर्सपासून सुरू होते. म्हणजे सुमारे 1 कोटी 47 लाख 19 हजार 560 रुपये एवढी या टीव्हीची सुरुवातीची किंमत आहे. या टीव्हीच्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 12 कोटी रुपये आहे. टीव्हीची किंमत ऐकूण धक्का बसणं सहाजिक आहे. पण वैशिष्ट्यांचा विचार करता, किंमत इतकी जास्त असणे योग्य आहे.