Flipkart GOAT सेलपूर्वीच पडली Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत! असा घ्या डिस्काऊंट आणि ऑफरचा फायदा
ई कॉमर्स फ्लिपकार्टवर 12 जुलैपासून GOAT सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह इतर गॅझेट्सच्या खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट दिलं जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला या सेलमध्ये गॅझेट्ससह इतर अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा सेल सुरु होण्यासाठी अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. मात्र या सेलपूर्वीच सॅमसंगच्या प्रिमियम स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
फ्लिपकार्टच्या आगामी सेलपूर्वी सॅमसंगचा पावरफुल फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. खरं तर हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन आता फ्लिपकार्टवर 82,748 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसवर एक्स्ट्रा बँक ऑफर्ससह आणखी डिस्काऊंट दिलं जाणार आहे. त्यामुळे ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी S24 अल्ट्राचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाला व्हेरिअंट केवळ 82,748 रुपयांना खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. लाँच प्राईजपेक्षा फोनची किंमत खूप कमी झाली आहे. याशिवाय जर तुम्ही स्मार्टफोनची खरेदी करताना फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर 4,000 रुपयांचं एक्स्ट्रा डिस्काऊंट देखील दिलं जाणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत 78,748 रुपये होते. याशिवाय, कंपनी या फोनवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही फोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता. म्हणजेच, जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा असेल तर फ्लिपकार्ट तुमच्या विद्यमान डिव्हाइसच्या स्थिती, ब्रँड आणि मॉडेलवर आधारित एक्सचेंज बोनस देखील देते, ज्यामुळे किंमत आणखी कमी होते. (फोटो सौजन्य – Samsung)
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर सॅमसंगच्या या दमदार स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंच AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये पावरफुल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर आहे. यासोबतच डिव्हाईस 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरी आहे. या सिरीजमधीस अल्ट्रा मॉडेलमध्ये सर्वात शक्तिशाली कॅमेरा देखील आहे. त्याचप्रमाणे, गॅलेक्सी S24 अल्ट्रामध्ये 200 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5x झूमसह 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप कॅमेरा आणि 3x झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी डिव्हाइसमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.