फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीचा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आज गॅलॅक्सी S सिरीजमधील अत्याधुनिक आणि अत्यंत स्टायलिश स्मार्टफोन गॅलॅक्सी S25 एज भारतात लाँच करत प्री-ऑर्डरला सुरुवात केली आहे. या प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ₹1,09,999 इतकी असून, ग्राहकांसाठी कंपनीने विशेष ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.
प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना मिळणार खास फायद
सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्टोअर्सवर गॅलॅक्सी S25 एजची प्री-ऑर्डर करणाऱ्यांना ₹12,000 पर्यंतचे स्टोअर अपग्रेड मोफत मिळणार आहे. याशिवाय, 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही दिला जात आहे, ज्यामुळे प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणे आणखी सुलभ होणार आहे.
गॅलॅक्सी S25 एजची मुख्य वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज हा कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्वात स्लिम आणि हलक्या स्मार्टफोन्सपैकी एक आहे. याची जाडी केवळ 5.8 मिमी असून वजन 163 ग्रॅम आहे. टायटॅनियम फ्रेम आणि Corning® Gorilla® Glass Ceramic 2 च्या वापरामुळे हा फोन केवळ स्टायलिशच नव्हे तर टिकाऊपणाही आहे. हा स्मार्टफोन 200MP वाइड कॅमेरा घेऊन येतो, जो सॅमसंगच्या नवीनीकृत नाइटोग्राफी टेक्नॉलॉजीसह सुसज्ज आहे. यामुळे कमी प्रकाशातही अधिक ब्राइट आणि स्पष्ट फोटो घेता येतात. याशिवाय, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि मॅक्रो फोटोग्राफीसाठी ऑटोफोकस सेन्सरही यात आहे.
हा डिव्हाइस Snapdragon 8 Gen चिपसेटवर चालतो. यात खास वेपर चेंबर कूलिंग टेक्नॉलॉजी दिली असून, दीर्घकाळ गेमिंग किंवा प्रोसेसिंगदरम्यान फोन गरम होत नाही. याशिवाय, AI-सक्षम प्रोव्हिज्युअल इंजिनद्वारे फोटो प्रोसेसिंगचा वेग आणि गुणवत्ता अधिक सुधारलेली आहे. या फोनमध्ये ऑन-डिव्हाइस AI तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये Galaxy AI एजंट्स, Gemini Live आणि Google सह सुसंगत स्मार्ट अॅप्सचा वापर करून वापरकर्त्यांना अधिक सुलभ संवाद आणि मल्टीटास्किंगचा अनुभव मिळतो. वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेसाठी यामध्ये Samsung Knox Vault टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला आहे, जी वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. गॅलक्सी S25 एज भारतात तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. विक्री लवकरच सॅमसंगचे अधिकृत स्टोअर्स तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर सुरू होणार आहे.
प्री-ऑर्डरसाठी भेट द्या:
www.samsung.com/in