
Samsung ला देणार होती थेट टक्कर! ट्राय-फोल्ड फोन केला तयार, पण लाँच झालाच नाही... कारण वाचून व्हाल हैराण
Huawei आणि सॅमसंगनंतर दुसऱ्या टेक कंपन्या देखील ट्रायफोल्ड फोनच्या मार्केटमध्ये उतरण्यासाठी तयारी करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, शाओमी सध्या अशाच एका डिव्हाईसवर काम करत आहे. तर ओप्पोने त्यांचे प्लॅनिंग बदलले आहे. काही दिवसांपासून असं सांगितलं जात होतं की, ओप्पो त्यांचा पहिला ट्रायफोल्ड स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. मात्र आता असं सांगितलं जात आहे की, टेक्नोलॉजी तयार असली तरी देखील कंपनी त्यांचा ट्रायफोल्ड फोन लाँच करणार नाही. ओप्पोच्या प्रोडक्ट मॅनेजमेंटने याबाबत पुष्टी केली असून त्यांनी सांगितलं आहे की, कंपनीने ट्रायफोल्ड फोनचे अनेक प्रोटोटाइप तयार केले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
ट्रायफोल्ड फोन कूल आणि स्टायलिश गॅझेट वाटत असलं तरी देखील एक असा फोन तयार करणं आणि विकणं अत्यंत कठिण आहे. असे डिव्हाईस तयार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो, ज्यामुळे फोनच्या किंमती देखील वाढतात. त्यामुळे या फोनसाठी ग्राहक शोधणं देखील कठीण होतं. अशा परिस्थितीत एवढं महागडे डिव्हाईस लाँच केल्यानंतर देखील ओप्पोला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असता.
काही काळापूर्वी आलेल्या एका अहवालानुसार, सॅमसंग आपला ट्रायफोल्ड फोन तोट्यात विकत आहे आणि त्याची किंमतही भरून काढू शकत नाही. याचाच विचार करून आता कंपनीने त्यांच्या ट्रायफोल्ड फोनचे लाँचिंग रद्द केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओप्पोने ट्रायफोल्ड फोन सेगमेंटपासून स्वत:ला पूर्णपणे वेगळे केले नाही. प्रोटोटाइप तयार करून कंपनीने भविष्यातील अनेक समस्या आधीच सोडवल्या आहेत. या सेगमेंटकडे पाहता, ओप्पो सध्या उत्पादन खर्च कमी होण्याची आणि ग्राहकांची मागणी स्थिर होण्याची वाट पाहत आहे.
Ans: ट्राय-फोल्ड फोन असा स्मार्टफोन असतो जो तीन भागांमध्ये दुमडता येतो. तो फोन, टॅबलेट किंवा मोठ्या स्क्रीनमध्ये रूपांतरित होऊ शकतो.
Ans: साध्या फोल्डेबल फोनमध्ये एकच फोल्ड असतो, तर ट्राय-फोल्ड फोनमध्ये दोन हिंग्स आणि तीन पॅनल्स असतात, त्यामुळे स्क्रीन साइज अधिक मोठी मिळते.
Ans: काही टेक कंपन्यांनी (Samsung, Huawei, Xiaomi सारख्या) ट्राय-फोल्ड प्रोटोटाइपवर काम केल्याची चर्चा आहे, मात्र बहुतांश फोन अजूनही अधिकृतरीत्या लाँच झालेले नाहीत.