Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! सॅमसंग गॅलॅक्सी एस२५ सिरीज प्री-ऑर्डर सुरू; किंमत ₹80,999 पासून

गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रामध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा कमी प्रकाशातही अपवादात्मक सुस्पष्टता देतो. प्रो लेव्हल व्हिडिओ एडिटिंगसाठी गॅलॅक्सी लॉग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 31, 2025 | 04:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंगने भारतात गॅलॅक्सी एस२५ सिरीज अधिकृतपणे लॉन्च केली असून, यात गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा, एस२५+ आणि एस२५ स्मार्टफोन्सचा समावेश आहे. ग्राहकांसाठी प्री-ऑर्डर २३ जानेवारीपासून सुरू झाली असून, एस२५ सिरीजच्या किमती अनुक्रमे ₹80,999, ₹99,999 आणि ₹1,29,999 पासून सुरू होतात.

डेटा सुरक्षित करण्यासाठी व्हिसा कंपनीच्या महत्त्वाच्या टिप्स; लक्षात ठेवाल तर फायद्यात रहाल

या सिरीजमध्ये गोरिला®️ आर्मर २ ग्लास सादर करण्यात आले आहे, जे स्मार्टफोनला २.२ मीटर उंचीवरून पडल्यावरही उत्कृष्ट टिकाऊपणा देते. अँटी-रिफ्लेक्टिव्ह ग्लास सिरॅमिक तंत्रज्ञानामुळे स्क्रीन सुस्पष्टता आणि स्क्रॅच रेसिस्टन्स यामध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाशस्थितीत चांगला व्हिज्युअल अनुभव मिळतो. गॅलॅक्सी एस२५ सिरीजमध्ये नवीन स्नॅपड्रॅगन®️ ८ एलाइट मोबाइल प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे, जो वन यूआय ७ द्वारा समर्थित आहे. यामुळे एआय-आधारित सुधारित वैशिष्ट्ये, उत्कृष्ट कॅमेरा तंत्रज्ञान आणि प्रॉसेसिंग क्षमतेसह सर्वोत्तम मोबाइल अनुभव मिळतो.

गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रामध्ये ५० मेगापिक्सलचा अत्याधुनिक अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे, जो फोटो व व्हिडिओ क्षेत्रात नव्या मापदंडांची स्थापना करतो. हा कॅमेरा कमी प्रकाशातही अपवादात्मक सुस्पष्टता देतो, ज्यामुळे अगदी अंधुक प्रकाशात देखील स्पष्ट आणि सुंदर छायाचित्रे टिपता येतात. यामध्ये 10-बिट HDR रेकॉर्डिंगची सुविधा दिली असून, त्याद्वारे चित्रांना अधिक नैसर्गिक आणि आकर्षक रंगछटा मिळतात. नको असलेला आवाज काढून टाकण्यासाठी दिलेला ऑडिओ एरेजर फिचर हे या कॅमेऱ्याचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य आहे, जे ऑडिओ गुणवत्तेला सुधारते. याशिवाय, प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर्ससाठी गॅलॅक्सी लॉगसह प्रो-लेव्हल व्हिडिओ एडिटिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे व्हिडिओ निर्मिती अधिक दर्जेदार आणि सर्जनशील होते. यामुळे कॅज्युअल युजर्सपासून ते प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर्सपर्यंत सर्वांसाठी हा कॅमेरा परिपूर्ण ठरतो.

महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती

गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ₹21,000 चे आकर्षक फायदे दिले जात आहेत. यामध्ये ₹12,000 चे स्टोरेज अपग्रेडचा समावेश असून, ग्राहकांना 12GB 256GB व्हेरिएंटच्या किमतीत थेट 12GB 512GB व्हेरिएंट मिळू शकतो. याशिवाय, ₹9,000 चा अतिरिक्त अपग्रेड बोनस देखील ग्राहकांना देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, 9 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय प्लॅनसह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹7,000 च्या कॅशबॅकचा लाभ मिळतो. गॅलॅक्सी एस२५+ साठी प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ₹12,000 चे फायदे दिले जात आहेत, तर गॅलॅक्सी एस२५ मॉडेल खरेदीवर ₹11,000 चा अपग्रेड बोनस दिला जात आहे. विशेष म्हणजे, सॅमसंग सर्व प्रमुख एनबीएफसीच्या माध्यमातून 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार सहज खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. प्री-ऑर्डरसाठी सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटसह सर्व आघाडीच्या ऑनलाइन व ऑफलाइन स्टोअर्सवर ही सिरीज उपलब्ध करण्यात आली आहे.

Web Title: Samsung galaxy s25 series pre orders open price starts from 80999

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Samsung Galaxy

संबंधित बातम्या

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनला छप्परफाड मागणी! कंपनीचा साठाच संपला
1

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनला छप्परफाड मागणी! कंपनीचा साठाच संपला

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात
2

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात

सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध; किंमत ₹1,09,999 पासून
3

सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध; किंमत ₹1,09,999 पासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.