Samsung चा स्लिम आणि शक्तिशाली स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच होण्याची शक्यता, ही असू शकते किंमत
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy S25 Edge असणार आहे. Samsung Galaxy S25 Edge हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि पावरफुल फोन असणार आहे. या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S25 Edge बाबत टीज करण्यात आली होती आणि नंतर एमडब्ल्यूसी 2025 मध्ये हा स्मार्टफोन सादर करण्यात आला.
भारत सरकारचा मोठा निर्णय, 1 करोड WhatsApp अकाउंट्स केले बॅन; काय आहे कारण? तुम्ही करू नका ही चूक
स्लिम आणि पावरफुल फोन Samsung Galaxy S25 Edge हा Galaxy S25 सिरीजचा भाग असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये व्हॅनिला Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra यांचा समावेश आहे. सॅमसंगने अद्याप Samsung Galaxy S25 Edge च्या आगमनाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र एका या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगचे संकेत दिले आहेत. (फोटो सौजन्य – X)
Just got an update from the source: Samsung Galaxy S25 Edge is launching in India next month. pic.twitter.com/HEISiBqL1m
— Abhishek Yadav (@yabhishekhd) March 20, 2025
अभिषेक यादव या टिपस्टरने Samsung Galaxy S25 Edge च्या भारतात लाँच टाइमलाइनचे संकेत दिले आहेत. हा फोन Snapdragon 8 Elite वर चालणार आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल अशी अपेक्षा आहे. X वरील टिपस्टर अभिषेक यादव (@yabhishekhd) यांनी दावा केला आहे की Galaxy S25 Edge पुढील महिन्यात भारतात लाँच होईल. याआधीच्या लीक्समध्ये फोनची लाँच तारीख 16 एप्रिल असल्याचे सुचवण्यात आले होते. निवडक क्षेत्रांमध्ये ते सुरू केले जाईल अशी अपेक्षा आहे.
याशिवाय, कमेंट सेक्शनमध्ये, टिपस्टरने असे सुचवले की Galaxy S25 Edge ची किंमत सुमारे 1,10,000 रुपये असू शकते. सुरुवातीच्या लीक्सनुसार, हा स्मार्टफोन अमेरिकेत $999 म्हणजेच अंदाजे 87,150 रुपयांना उपलब्ध असू शकतो.
सॅमसंगने जानेवारीमध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड लाँच इव्हेंटमध्ये आणि नंतर मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये Galaxy S25 Edge सादर केला होता. यात स्लिम फॉर्म फॅक्टर आहे आणि कॅमेरा मॉड्यूलभोवती त्याची जाडी 8.3mm असल्याचे म्हटले जाते. हे Galaxy S25 फॅमिलीप्रमाणे Snapdragon 8 Elite for Galaxy प्रोसेसरवर चालण्याची शक्यता आहे. यात 12GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.66 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन असण्याची अपेक्षा आहे.
Galaxy S25 Edge Android 15-बेस्ड One UI 7 सह येण्याची शक्यता आहे आणि Galaxy AI फीचर्सना समर्थन देईल. फोनमध्ये 3,900mAh बॅटरी असू शकते जी 25W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. टीझरनुसार, यात ड्युअल रियर कॅमेरा युनिट असेल. कॅमेरा सेटअपमध्ये 200-मेगापिक्सेल सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो. फोनचे वजन सुमारे 162 ग्रॅम असण्याचा अंदाज आहे.