Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी
ऑनलाइन रिटेलर Jumbo.ae वर लिस्टेड असलेल्या Honor X6d च्या 4GB + 256GB व्हेरिअंटची किंमत UAE मध्ये AED 509 म्हणजेच सुमारे 12,600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक आणि ओशन स्यान कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप हा स्मार्टफोन कोणत्या इतर देशांमध्ये लाँच केला जाणार याची माहिती दिली नाही. (फोटो सौजन्य – YouTube)
Honor X6d मध्ये 6.75-इंच HD+ LCD स्क्रीन आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेटसह 4GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्सपांडेबल स्टोरेज सपोर्ट उपलब्ध असेल की नाही, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. हे डिव्हाईस अँड्रॉईड 15 मॅजिक ओएस 9 वर आधारित आहे.
फोटोग्राफीसाठी Honor X6d मध्ये f/2.0 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा आहे, जो 30fps वर 1080p पर्यंत व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला f/2.2 अपर्चरवाला 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. वेबसाइटवर वाय-फाय आणि ब्लूटूथ सारखी इतर चांगली वैशिष्ट्ये सूचीबद्ध नसली तरी, त्यापैकी बहुतेकांना सपोर्ट मिळेल असे गृहीत धरले जाऊ शकते.
Honor X6d मध्ये जाड बेजेल्स आहेत आणि समोरील बाजूला सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटर ड्रॉप-स्टाइल नॉच आहे. मागील बाजूस वरच्या डाव्या कोपऱ्यात एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्याच्या बाजूला दोन मोठे गोल कटआउट्स आणि एक LED फ्लॅश आहे, जो मॅट मागील पॅनेलच्या विरूद्ध चमकदार कॉन्ट्रास्ट प्रदान करतो. फोनच्या कडा देखील सपाट आहेत, उजव्या काठावर पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आहेत.






