टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आपल्या स्मार्टफोनवर आढळून येतात, अशाप्रकारे करा साफ
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. डायनिंग टेबलपासून ते बाथरूमपर्यंत आपण दिवसभर त्याचा वापर करतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचा स्मार्टफोन हे बॅक्टेरियाचे सर्वात मोठे घर आहे? अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की स्मार्टफोनमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात, जे फार धक्कादायक आहे. हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच हानिकारक नाही तर तुमच्या कुटुंबासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे स्मार्टफोनची नियमित साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही तुमचा स्मार्टफोन एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने घरीच साफ करू शकता. यासाठीचे काही प्रभावी उपाय आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही घरीच तुमचा स्मार्टफोन चांगल्या प्रकारे क्लीन करू शकता.
घरच्या घरी आपला स्मार्टफोन कसा सफर करावा
साफसफाई करताना कोणताही ओलावा किंवा नुकसान टाळण्यासाठी तुमचा फोन बंद करणे ही पहिली स्टेप आहे. यानंतर एक मायक्रोफायबर कापड घ्या आणि त्याला हलके भिजवा. कापड जास्त ओले नसावे हे लक्षात ठेवा. धूळ आणि बोटांचे ठसे काढून टाकण्यासाठी स्क्रीन हळूवारपणे या कापडाने पुसून टाका.
बाजारात उपलब्ध असलेल्या लिक्विडने करा साफ
फोन स्वच्छ करण्यासाठी बाजारात एक लिक्विड देखील उपलब्ध आहे जे बॅक्टेरिया देखील मारते. त्याच्या मदतीने तुम्ही फोन स्वच्छ करू शकता. बटणे आणि पोर्ट्सभोवती साचलेली घाण साफ करण्यासाठी कापसाच्या झुबकेचा वापर करा. ज्या ठिकाणी कापड पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी लहान ब्रशचाही वापर केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या फोनवर कव्हर किंवा केस वापरत असल्यास, ते वेगळे स्वच्छ करा. प्लास्टिक किंवा सिलिकॉन केस कोमट पाण्याने आणि साबणाने धुतले जाऊ शकतात. धुतल्यानंतर, कव्हर पूर्णपणे कोरडे होऊ द्या आणि नंतर ते फोनवर ठेवा.
काळजीपूर्वक स्वच्छ करा स्पीकर ग्रिल आणि कॅमेरा लेन्स
स्पीकर ग्रिल आणि कॅमेरा लेन्स स्वच्छ करण्यासाठी हळूवारपणे कापसाच्या झुबकेचा वापर करा. त्यात ओलावा जाणार नाही याची काळजी घ्या. फोन साफ केल्यानंतर, फोन पूर्णपणे कोरडा करा आणि त्यानंतरच तो चालू करा. कोठेही ओलावा किंवा पाण्याचे कण शिल्लक नाहीत याची खात्री करून घ्या. असे न केल्यास हे तुमच्या स्मार्टफोनसाठी नुकसानकारक ठरू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा