
स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
सायबर क्राईम पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सुमारे 6000 लोक रोज सायबर फ्रॉडचे शिकार बनतात. याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी सरकारद्वारे विविध प्रकारचे कॅम्पेन देखील आयोजित केले जातात. अनेकदा तर लोकांना समजत देखील नाही की आपण सायबर फ्रॉडचे शिकार झालो आहोत आणि त्यांच्या खात्यातून पैसे सायबर गुन्हेगारांच्या खात्यात ट्रान्सफर होतात. अनेकदा तर लोक स्मार्टफोनद्वारे होणाऱ्या घोस्ट हॅकिंगची शिकार देखील बनतात. मात्र 2026 मध्ये तुम्हाला ऑनलाईन फ्रॉडपासून सुरक्षित राहायचे असेल आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकायचे नसेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक सोपी सेटिंग ऑन करू शकता. या सेटिंगच्या मदतीने सायबर गुन्हेगार नक्कीच तुमच्या पासून चार हात लांब राहतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबर गुन्हेगार अँड्रॉइड युजर्सना अगदी सहज शिकार बनवू शकतात. सायबर गुन्हेगार युजरना मेसेज, व्हाट्सअप किंवा इतर पद्धतीने लिंक पाठवतात आणि या लिंकवर क्लिक करताच फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केला जातो. यानंतर तुमच्या स्मार्टफोनचा एक्सेस हॅकर्सकडे जातो आणि तुमचा स्मार्टफोन नियंत्रित केला जातो. याशिवाय मालवेअरद्वारे हॅकर्स स्मार्टफोनमधील वैयक्तिक माहिती देखील चोरतात आणि याचा दुरुपयोग देखील केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या फोनची सुरक्षा करायची असेल आणि तुमचा डेटा सुरक्षित राहावं असेल जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील दोन सेटिंग ऑन करू शकता. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये हॅकर्स कोणताही ॲप इंस्टॉल करू शकणार नाहीत. या पद्धतीने हॅकर्स तुमचा फोन एक्सेस करू शकणार नाहीत. तसेच तुमची ऑनलाईन स्कॅमपासून सुरक्षा देखील होईल.
सर्वात आधी अँड्रॉईड यूजर्सना थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल होण्यापासून थांबवणे गरजेचे आहे. यासाठी यूजर्सना त्यांच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर सर्च ऑप्शनमध्ये Install Unknown Apps सर्च करावे लागणार आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसणाऱ्या Install Unknown Apps वर टॅप करून लिस्टमध्ये दिसणाऱ्या अनोळखी ॲप्सला इन्स्टॉल करण्याची परवानगी देणारी सेटिंग बंद करावी लागणार आहे. अनेक फोनमध्ये ही सेटिंग बाय डिफॉल्ट नॉट अलाउड सेट असते. मात्र काही कारणांमुळे फोनमध्ये जर ही सेटिंग ऑन असेल तर हॅकर्स तुमचा फोन हॅक करू शकतात. तसेच तुमच्या फोनमध्ये मालवेअर देखील इन्स्टॉल करू शकतात.
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर पुन्हा एकदा फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि गुगल प्ले प्रोटेक्ट सर्च करा. आता तुम्हाला समोर दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा आणि सेटिंग इनेबल करा. ही सेटिंग चालू केली असेल तर गुगल प्ले स्टोअरमधून ॲप इन्स्टॉल करताना तुम्हाला समजते की ॲप सिक्योअर आहे की नाही. ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये केवळ तेच ॲप इन्स्टॉल होतील जे गुगल प्लेवर लिस्ट केले असतील. हे तुमच्या फोनवर इन्स्टॉल केलेले अॅप्स मालवेअर देखील स्कॅन करेल. अशा प्रकारे, तुम्ही तुमचा फोन हॅकर्सपासून वाचवू शकता.