Blinkit वरून तुम्ही काय मागवले याचा कुणाला थांगपत्ताही लागणार नाही, ऑर्डर हिस्ट्री कशी डिलीट करावी ते जाणून घ्या
ब्लिंकिट हे एक लोकप्रिय क्विक-कॉमर्स ॲप आहे. काही काळापूर्वी या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणण्यात आले होते. हे फिचर ऑर्डर हिस्ट्री हटविण्यासाठी वापरले जाते. हे फिचर त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना आपली ऑर्डर हिस्ट्री क्लिअर करायची आहे. या फिचरसह, युजर्स त्यांच्या अकाउंटमधून त्या स्पेसिफिक ऑर्डर डिलीट करू शकतात, जे युजर्स त्यांच्या अकाउंटमध्ये पाहू इच्छित नाहीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ब्लिंकिटवर आपली ऑर्डर हिस्ट्री डिलीट कशी करायची याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. हे फिचर तुमच्या बरेच कामी येऊ शकते. स्टेप बाय स्टेप याविषयी जाणून घेऊया.
30 डिसेंबर 2024 च्या ब्लिंकिट फाउंडर अलबिंदर ढींडसाने एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले होते की, हे फिचर सादर केल्याच्या एका आठवड्याभरातच, ब्लिंकिट ॲपवरून 104,924 हून अधिक ऑर्डर हटवण्यात आल्या. हे दर्शविते की लोकांना खरोखर या फीचरची किती आवश्यकता आहे.
Mahakumbh 2025: युजर्सची मजा; BSNL देणार फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सर्व्हिस
You can now delete orders from your Blinkit order history! We rolled out this feature last week, and 1,04,924 orders have already been deleted since then 😅 New year, new order history 😂 pic.twitter.com/Htwh0FotJz — Albinder Dhindsa (@albinder) December 30, 2024
जेव्हा युजर ब्लिंकिट वरून ऑर्डर हटवतो तेव्हा ऑर्डरचे डिटेल्स ॲपवरून कायमचे हटवले जातात आणि त्या ऑर्डरसाठी कस्टमर सपोर्ट उपलब्ध नसते. यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही यावरून कोणती गोष्ट ऑर्डर केली होती ते समजले जाणार नाही. तथापि, ऑर्डर दुसऱ्याने दिल्यास, त्यांच्या अकाउंटमध्ये त्याबाबतचे डिटेल्स दिसतील.
Blinkit वरून ऑर्डर डिलीट कशी करावी?
लक्षात ठेवा की एकदा ऑर्डर हटवल्यानंतर, ते पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही आणि डिटेल्स तुमच्या अकाऊंटमधून कायमचे हटवले जातात. सध्या एकाच वेळी अनेक ऑर्डर डिलीट करण्याचा पर्याय नाही. तुम्हाला प्रत्येक ऑर्डर स्वतंत्रपणे हटवावी लागेल. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, इथे तुम्ही एक वर्षापेक्षा जुन्या ऑर्डर देखील हटवू शकता.