Smartphone Tips: स्मार्टफोन अपडेट करणं टाळतायं? लवकरच तुमचा महागडा मोबालईही बनू शकतो भंगार, काय म्हणाले तज्ज्ञ?
स्मार्टफोनमुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झालं आहे. स्मार्टफोन आपल्या आयुष्यात अनेक फायदे घेऊन येतो. स्मार्टफोनमध्ये होणारे बदल आपल्याला फायदेशीर ठरत असतात. गेल्या काही वर्षांपासून स्मार्टफोनमध्ये AI चं देखील वापर करता येत आहे. यामुळेच आपली अनेक काम अगदी सोपी होतात. स्मार्टफोनला अधिक पावरफुल आणि अपग्रेड करण्यासाठी कंपनी सतत सॉफ्टवेअर अपडेट रिलीज करत असतात. या सॉफ्टवेअर अपडेटच्या मदतीने आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक बदल केले जातात आणि स्मार्टफोनची सुरक्षा वाढवली जाते.
स्मार्टफोनमधील फीचर्स आणि युजरची सुरक्षा वाढवण्यासाठी कंपनी सतत नवीन अपडेट्स घेऊन येत असते. तसेच या अपडेट्समुळे स्मार्टफोन वापरण्याची मजा देखील दुप्पट होते. असे अनेक लोक आहेत जे अपडेट्सकडे लक्ष देत नाहीत. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की स्मार्टफोन हॅक होण्यापासून स्मार्टफोन हँग होण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनेक स्मार्टफोन एक्सपर्टने असा सल्ला दिला आहे की, स्मार्टफोन कंपनीने जारी केलेले अपडेट वेळोवेळी डिवाइसमध्ये इन्स्टॉल करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा युजर्सना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच स्मार्टफोन हॅक होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते. वेळोवेळी स्मार्टफोन्स अपडेट न केल्याने स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर देखील परिणाम होतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन कंपन्या दर महिन्याला त्यांच्या डिवाइससाठी सिक्युरिटी पॅच जारी करत असतात. हॅकर्सपासून सुरक्षा करण्यासाठी हे सिक्युरिटी पॅच अत्यंत गरजेचे असतात. मात्र युजर्स हे सिक्युरिटी पॅच दुर्लक्षित करतात. ज्यामुळे स्मार्टफोन्समधील धोका वाढतो आणि युजर्स अगदी सहजपणे हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकतात. यासाठी दर महिन्याला जारी केले जाणारे सिक्युरिटी पॅच इन्स्टॉल करणे अत्यंत गरजेचे आहे.
सिक्युरिटी पॅच सोबतच स्मार्टफोन कंपनी नवीन फीचर्स आणि अधिक चांगलं एक्सपिरीयन्स ऑफर करतो. मात्र जर तुम्ही अपडेट इन्स्टॉल केले नाहीत तर तुम्हाला नवीन फीचर्स अधिक चांगला स्मार्टफोन एक्सपिरीयन्स मिळणार नाही.
तुम्ही तुमचा स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट केला नाही तर तुम्हाला कॉम्पॅटिबिलिटीमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक ॲप्स लेटेस्ट os वर्जनच्या हिशोबाने डिझाईन करण्यात आलेले असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये जुना सॉफ्टवेअर वापरत असाल तर अशावेळी स्मार्टफोनमधील ॲप्स क्रॅश होण्याची शक्यता असते. तसेच अनेकदा हे ॲप्स अचानक काम करणे बंद करतात.
विचार तुम्ही करा आणि लिहिणार AI! ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी तयार केले अनोखी टोपी, अशी करणार काम
जर तुम्ही दीर्घकाळासाठी फोन अपडेट केला नाहीत पण त्याच्या बॅटरीवर देखील परिणाम होऊ शकतो. बॅटरी आणि परफॉर्मन्स अधिक चांगला ठेवण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये वेळोवेळी अपडेट इन्स्टॉल करणे अत्यंत गरजेचे आहे.
असेही आढळून आले आहे की कधीकधी जुन्या व्हर्जनमधील काही बगमुळे फोन हँग होऊ लागतो आणि कधीकधी डेटा गमावण्याचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीत, फोन वेळेवर अपडेट करणे खूप महत्वाचे होते. नवीन अपडेट्स केवळ बग दुरुस्त करत नाहीत तर कार्यक्षमता देखील वाढवतात.