Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

कंपनीने अलीकडेच लाँच केलेला स्वस्त आयफोन 17 ई बराच चर्चेत आहे. कारण या आयफोन मॉडेलची डिझाईन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 ई सारखीच आहे. मात्र फीचर्स बदलले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 12:11 PM
iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या नजरेत दोन्ही आयफोन मॉडेल्स एकसारखेच दिसतात
  • नवीन आयफोन 17 ई मध्ये A19 चिप
  • आयफोन 17 ई ची बॅटरी 26 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाईम ऑफर करते
अलीकडचे आयोजित करण्यात आलेल्या एका ईव्हेंटमध्ये टेक कंपनी अ‍ॅपलने त्यांचा स्वस्त आयफोन 17 ई लाँच केला आहे. पहिल्या नजरेत हा आयफोन मॉडेल गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 ई सारखाच दिसत आहे. डिझाईन समान असली तरी देखील फीचर्समध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. लेटेस्ट लाँच आयफोन 17 ई मध्ये मॅगसेफ सपोर्ट, नवीन A19 चिप, अधिक चांगले डिस्प्ले प्रोटेक्शन आणि डबल बेस स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेले लेटेस्ट आयफोन मॉडेल गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 ई पेक्षा किती वेगळे आहे, याबाबत जाणून घेऊया.

Apple Event 2026: मुहूर्त ठरला… या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

डिझाईनमध्ये काय बदलले?

पहिल्या नजरेत दोन्ही आयफोन मॉडेल्स एकसारखेच दिसत आहेत. यामध्ये 6.1-इंच डिस्प्ले, एल्यूमिनियम बॉडी, IP68 रेटिंग आणि फेस आयडी सपोर्ट देण्यात आला आहे. तथापी, आयफोन 17 ई मध्ये यावेळी एक नवीन रंग सादर करण्यात आला आहे. आता ग्राहक सॉफ्ट पिंक रंगात देखील आयफोन 17 ई खरेदी करू शकणर आहेत. यासोबतच नवीन मॉडेलमध्ये सिरेमिक शील्ड देण्यात आली आहे. नवीन मॉडेलमध्ये एक नवीन एंटी-रेफलेक्टिव कोटिंग दिले आहे, ज्यामुळे सूर्याच्या प्रकाशात देखील डिस्प्ले स्पष्टपणे पाहू शकतो. आधीच्या मॉडेलप्रमाणेच डिव्हाईस 60Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

परफॉर्मंसमध्ये मोठा अपग्रेड

नवीन आयफोन 17 ई मध्ये A19 चिप आहे, जी 3nm आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे आणि पॉवर कार्यक्षमतेसह सुधारित एआय कामगिरी देऊ शकते. तर जुन्या आयफोन 16 ई मध्ये A18 चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच, नवीन मॉडेलमध्ये नवीन C1X मॉडेम आहे, जो मागील डिव्हाईसेक्षा 2 पट अधिक वेगवान आहे. डिव्हाईसमध्ये वायफाय7 आणि ब्लूटूथ 6 सपोर्ट देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

आयफोन 17 ई ची बॅटरी 26 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाईम ऑफर करते. तर 16 ई मध्ये 22 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम ऑफर केला जातो. नवीन मॉडेलच्या चार्जिंगमध्येही लक्षणीय बदल दिसून येत आहेत, जो आता मॅगसेफ वायरलेस चार्जिंग (15W) ला सपोर्ट करतो, जो 16 ई मध्ये 7.5W क्यूई पेक्षा जास्त आहे. यूएसबी-सी फास्ट चार्जिंग दोन्हीसाठी सामान्य आहे.

AI फीचर्समध्ये काय बदललं?

दोन्ही डिव्हाईस अ‍ॅपल ईंटेलिजेंसला सुपोर्ट करतात आणि iOS 26 सह येतात. दोन्ही फोनमध्ये कॉल स्क्रीनिंग, होल्ड असिस्ट आणि लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन सारखी सर्व वैशिष्ट्ये आहेत. तथापि, A19 चिपमुळे 17e AI टास्क थोडे सोपे आणि जलद चालवेल.

आयफोनपासून मॅकबुपर्यंत… Apple प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट नाही इथे उपलब्ध आहे Deal

कॅमेऱ्यात काय बदलले?

दोन्ही डिव्हाईसमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यावेळी फक्त फरक इमेज प्रोसेसिंगचा आहे, 17 ई आता फोटोंमध्ये प्राणी, कुत्रे आणि मांजरींचे पोर्ट्रेट ऑटो-डिटेक्ट करते आणि डेप्थ डेटा सेव्ह करते. नवीन मॉडेलमध्ये नंतर पोर्ट्रेट देखील अ‍ॅडजस्ट करता येतात. स्किन-टोन एचडीआर आणि नॅचरल कलरिंग सुधारले आहे. फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेलचाच राहतो, कोणतेही अपग्रेड नाही.

किंंमतींमध्ये काय फरक?

आयफोन 17 ईच्या 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,900 रुपये आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 84,900 रुपये आहे. आयफोन 16 ई च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 59,900 रुपये, 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 69,900 रुपये आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे.

Web Title: Iphone 17e vs iphone 16e which model offer amazing and powerful performance tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.