Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगलच्या या सर्च रिझल्टने हॅक होईल तुमचा डेटा! अलर्ट जारी, काय आहे प्रकरण?

आपण गुगलवर दिवसभरात शेकडो गोष्टी सर्च करत असतो. मात्र हाच सर्च रिझल्ट आता अनेकांना महागात पडणार आहे. गुगलच्या सर्च रिझल्टवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करताच हॅकींस आणि डेटा लिक झाल्याची अनेक प्रतकणं समोर आली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2024 | 02:30 PM
गुगलच्या या सर्च रिझल्टने हॅक होईल तुमचा डेटा! अलर्ट जारी, काय आहे प्रकरण?

गुगलच्या या सर्च रिझल्टने हॅक होईल तुमचा डेटा! अलर्ट जारी, काय आहे प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:

सायबर गुन्हे आणि सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक सायबर घोटाळे हे केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेट युजर्ससोबतच घडत आहेत. सायबर गुन्हेगार इंटरनेट युजर्सची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत. आतापर्यंत कधी खोटे मॅसेज पाठवून तर कधी खोटे कॉल करून लोकांची फसवूणक केली जात होती. मात्र आता गुगलच्या सर्च रिझल्टमुळे लोकांची फसवणूक होत आहे.

हेदेखील वाचा- हैदराबाद मेट्रो रेल्वेने सुरु केली नवीन सेवा, आता गुगल वॉलेटद्वारे होणार तिकीट बुकिंग

आपण आपल्या प्रत्येक कामासाठी गुगलचा वापर करतो. गुगलच्या वापराशिवाय आपला एकही दिवस पूर्ण होत नाही. आपण गुगलवर दिवसभरात शेकडो गोष्टी सर्च करत असतो. अशाच लोकांना सध्या सायबर गुन्हेगार टार्गेट करत आहेत. गुगल सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताच तुमची वैयक्तिक माहिती हॅक होईल. तसेच तुमच्या संगणाकाचा कंट्रोल देखील हॅकर्सकडे जाईल. (फोटो सौजन्य – pinterest)

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर सिक्युरिटी कंपनी SOPHOS कडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही गुगलवर Are Bengal Cats Legal in Australia? हा प्रश्न सर्च केला आणि सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचा डेटा हॅक होऊन तुमच्या संगणकाचा कंट्रोल हॅकर्सकडे जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की हे 6 शब्द शोधणारे वापरकर्ते सायबर हल्ल्यांना बळी पडण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढत आहे.

लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडला जातोय

SOPHOS च्या मते, वापरकर्त्यांना या लिंक्स किंवा ॲडवेअरवर क्लिक करण्यास भाग पाडले जात आहे. या प्रकरणात, हे कायदेशीर गुगल सर्चद्वारे केले जात आहे. SOPHOS ने जारी केलेल्या अलर्टनुसार, असे दिसते की स्कॅमर विशेषत: त्यांच्या सर्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या लोकांना लक्ष्य करत आहेत.

हेदेखील वाचा- ॲपलनंतर गुगललाही झटका! या देशाने Google च्या Pixel स्मार्टफोनच्या विक्रीवर घातली बंदी

SOPHOS ने युजर्सना दिला हा सल्ला

सायबर गुन्हेगारांच्या या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी SOPHOS इंटरनेट युजर्सना सल्ला दिला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जेव्हा युजर्स सर्च रिझल्टवर क्लिक करतात तेव्हा त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स एका प्रोग्रामच्या मदतीने ऑनलाइन शेअर केले जातात. त्यामुळे सध्या गुगलवर Are Bengal Cats Legal in Australia? हा प्रश्न सर्च करणं धोकादायक ठरू शकतं. तसेच ज्यांनी आतापर्यंत हा प्रश्न गुगलवर सर्च केला आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या गुगल अकाऊंटचा पासवर्ड बदलणं गरजेचं आहे.

SOPHOS बद्दल जाणून घ्या

Sophos Ltd. ही एक ब्रिटिश सुरक्षा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनी आहे. जॅन ह्रुस्का आणि पीटर लॅमर यांनी केली आणि 1985 मध्ये SOPHOS ची स्थापन केली. सायबर फ्रॉड आणि स्कॅम सारख्या घटनांवर SOPHOS लक्ष ठेवते.

Web Title: Sophos issued warning for google users this search result will hack your data know how to protect your data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • Google Search

संबंधित बातम्या

इंजिनिअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क
1

इंजिनिअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.