हैदराबाद मेट्रो रेल्वेने सुरु केली नवीन सेवा, आता गुगल वॉलेटद्वारे होणार तिकीट बुकिंग
हैदराबाद मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एक नवीन अनुभव मिळणार आहे. आता प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. कारण हैदराबाद मेट्रो रेल्वेने तिकीट बुकींगसाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. आता प्रवासी गुगल वॉलेटद्वारे तिकीट बुक करू शकणार आहेत. यासाठी रुट मोबाईल, क्लाउड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सर्विस प्रोव्हाईडर यांनी बिलेसी, मुंबई बेस्ड इंटिग्रेशन पार्टनर आणि हैदराबाद मेट्रो रेल्वे (HMR) सोबत भागिदारी केली आहे. रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस (RCS) आणि गुगल वॉलेट वापरून हैदराबाद मेट्रो रेल्वेसाठी तिकीट बुकींग सेवा सुरु केली जात आहे.
हेदेखील वाचा- US President Election: AI ने सांगितला अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल, वाचून बसेल धक्का
या नवीन सेवेमुळे हैद्राबाद मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तिकीट बुक करणं शक्य होणार आहे. रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस (RCS) च्या मदतीने प्रवासी डीफॉल्ट अँड्रॉइड मेसेजिंग ॲपवरून थेट तिकिटे बुक करण्यास सक्षम असतील. यामुळे आता प्रवाशांना तिकीटांच्या लांब रांगेत थांबण्याची किंवा अतिरिक्त ॲप्स डाउनलोड करण्याची गरज नाही. प्रवासी QR कोड स्कॅन करून किंवा Google Messages द्वारे L&T मेट्रो रेल्वेच्या अधिकृत हँडलवर मॅसेज पाठवून तिकीट बुक करू शकतात. यासाठी प्रवाशांना त्यांचे लोकेशन आणि तिकीट प्रकार निवडण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
या नवीन सेवेमुळे प्रवाशांना एक आगळा वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या तिकीट बुकींगवेळी प्रवासी UPI द्वारे सुरक्षितपणे पेमेंट करू शकतात. एकदा बुक केल्यानंतर, तिकिटे गुगल वॉलेटमध्ये सेव्ह केली जातात. ज्यामुळे कोणतेही नवीन ॲप डाउनलोड करण्याची गरज भासत नाही. गुगल वॉलेटवर अगदी काही क्षणातच तिकीट बुक करून प्रवासी त्यांच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. हे Google Messages ॲपमध्ये काम करते. सध्या, हे फक्त Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- Wikipedia Controversy: केंद्र सरकारची विकिपीडियाला नोटीस, प्रकरण चुकीची माहिती देण्याशी संबंधित! वाचा सविस्तर
L&T मेट्रो रेल हैद्राबादचे व्यवस्थापकीय संचालक आणि सिईओ केवीबी रेड्डी, एचएमआरचे व्यवस्थापकीय संचालक एनवीएस रेड्डी, रूट मोबाईलचे सीईओ राजदीपकुमार गुप्ता आणि बिलेसी सीईओ आकाश पाटील हे लाँचिंगवेळी उपस्थित होते. ही सेवा वापरण्यासाठी, प्रवाशांनी फक्त QR कोड स्कॅन करणे आणि Google Messages वर RCS मेसेजिंगद्वारे अधिकृत L&T मेट्रो रेल हैदराबादच्या हँडलवर ‘हाय’ पाठवणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यांना त्यांचे सोर्स, लोकेशन आणि तिकीट प्रकार निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रवासी UPI सारख्या पर्यायांद्वारे सुरक्षितपणे पेमेंट पूर्ण करू शकतात. एकदा बुक केल्यावर, तिकिटे गुगल वॉलेटमध्ये सेव्ह केली जातात. RCS प्रवाशांना त्यांच्या डीफॉल्ट Android मेसेजिंग ॲप – Google Messages वरून थेट तिकिटे बुक करण्याची परवानगी देते, ज्यामुळे स्टेशनवर लांब तिकिटांच्या रांगेत थांबण्याची किंवा अतिरिक्त ॲप्स डाउनलोड करण्याची आवश्यकता नाहीशी होते.