माऊस आणि कीबोर्ड खरेदीसाठी बाजारात जाण्याची गरज नाही! 10 मिनिटांत होणार सामानाची डिलीव्हरी, या कंपनीने Asus सोबत केली भागीदारी
इंस्टंट डिल्हीव्हरी अॅप्स स्विगी इंस्टामार्ट, फ्लिपकार्ट मिनिट्स, ब्लिंकीट, झेप्टो, हे सर्व आपल्याला केवळ 10 मिनिटांत आपण ऑर्डर केलेल्या सामानाची डिलीव्हरी देतात. आपण या अॅप्सवरून भाज्या, फळे, खाद्यपदार्थ, या सर्व वस्तू ऑर्डर करू शकतो. एवढचं नाही तर तुम्ही इथे स्मार्टवॉच, स्मार्टफोन, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील ऑर्डर करू शकता. या सर्व वस्तूंसोबतच आता तुम्ही तुमच्या लॅपटॉपसाठी लागणारे माऊस आणि किबोर्ड देखील ऑर्डर करू शकणार आहात. म्हणजेच वर्क फ्रॉम होम करताना तुमच्या लॅपटॉपचा माऊस खराब झाला तर तुम्ही तात्काळ ऑर्डर करू शकता आणि केवळ 10 मिनिटांत तुम्हाला तुमच्या सामानाची डिलीव्हरी मिळणार आहे.
तुम्हाला केवळ मिनिटांत तुमचा नवीन माऊस आणून देण्यासाठी इंस्टंट डिल्हीव्हरी अॅप स्विगी इंस्टामार्ट तुमची मदत करणार आहे. यासाठी कंपनीने टेक कंपनी Asus सोबत भागिदारी केली आहे. Asus ने Swiggy Instamart सह भागिदारीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, काही निवडक शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जात आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या Asus च्या एक्सेसरीज जसे की कीबोर्ड, माउस आणि चार्जर ऑर्डर करू शकता. पुढील 10 मिनिटांत तुम्हाला तुमच्या या सामानाची डिलीव्हरी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Asus Marshmallow कीबोर्ड, Silent Ergo माउस आणि 65W Type-C GaN चार्जर आता Swiggy Instamart वर इतर वस्तूंसह उपलब्ध करण्यात आले आहेत. Swiggy Instamart व्यतिरिक्त जानेवारी महिन्यात Asus ने Zepto सोबत देखील भागिदारी केली होती. Asus ने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, Swiggy Instamart च्या सहकार्याने, निवडक शहरांमध्ये 10 मिनिटांत डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद, चेन्नई, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये आसुस कीबोर्ड, माउस आणि चार्जर घरपोच डिलिव्हरीसाठी उपलब्ध असतील.
Your desk setup upgrade is now just a Swiggy Instamart order away. ASUS accessories, delivered fast!😎
Now live in Pune, Ahmedabad, Gurgaon, Lucknow, Chennai, Hyderabad & Kolkata.
More cities loading… yours might be next!😉
Check it out – https://t.co/1SoNJiHcAZ #AsusIndia pic.twitter.com/slioAe4Xfp— ASUS India (@ASUSIndia) April 9, 2025
Asus 65W Type-C यूनिवर्सल अडॅप्टर (Black) आणि 65W Type-C GaN यूनिवर्सल अडॅप्टर (Black) देखील क्विक डिलीव्हरीसाठई उपलब्ध आहेत. KW100 Marshmallow कीबोर्ड (Beige), CW100 वायरलेस कीबोर्ड (Green) आणि माउस कॉम्बो देखील क्विक डिलीव्हरीसाठई उपलब्ध आहेत. याशिवाय, MD102 Silent Ergo माउस, MW103 वायरलेस साइलेंट माउस आणि MD100 Marshmallow मल्टी-डिवाइस वायरलेस माउस देखील प्लेटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या वस्तू ऑर्डनंतर केवळ 10 मिनिटांत डिलीव्हर केल्या जाणार आहेत.
Asus जानेवारीपासून Zepto सोबत भागीदारी केली आहे आणि दिल्ली एनसीआर, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये त्यांचे काही कीबोर्ड आणि माऊस विकत आहे. Swiggy Instamart ने अलीकडेच Apple, Samsung, OnePlus आणि Redmi सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनची घरपोच डिलिव्हरी सुरू केली आहे, जी बंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, फरीदाबाद, नोएडा, गुरुग्राम, कोलकाता, हैदराबाद आणि पुणे येथे उपलब्ध आहे. ही सेवा लवकरच इतर शहरांमध्येही सुरू होईल. इन्स्टामार्टची प्रतिस्पर्धी ब्लिंकिट देखील अनेक शहरांमध्ये स्मार्टफोन डिलिव्हरी सेवा देत आहे.