Realme ची नवीन सिरीज अखेर लाँच, कलर बदलणारं डिजाइन आणि 6000mAh बॅटरी फीचर्सने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी Realme ची बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सिरीज Realme 14 Pro अखेर भारतात लाँच करण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. कंपनीने Realme 14 Pro सिरीज अंतर्गत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सिरीजची खासियत म्हणजे त्यामध्ये रंग बदलणारे बॅक डिझाइन आहे. याच कारणामुळे सिरीज तरूणांंमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे. या सिरीजमध्ये मागील सिरीजच्या तुलनेत कंपनीने कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत अनेक अपग्रेड्स दिले आहेत. चला तर मग या सिरीजच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया.
सैफच्या घरातील चोर शोधण्यासाठी वापरले मोबाईल डेटा डंप! काय आहे ही टेक्नॉलॉजी? जाणून घ्या
Realme 14 Pro च्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आहे. तसेच, Realme 14 Pro+ चा 256GB व्हेरिअंट 29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Realme 14 Pro जयपूर पिंक, पर्ल व्हाइट आणि स्यूडे ग्रे रंगात उपलब्ध आहे. तसेच, Realme 14 Pro+ हा पर्ल व्हाइट, स्यूडे ग्रे आणि बिकानेर पर्पल रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर्स आणि डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनी Realme 14 Pro+ वर 4,000 रुपयांपर्यंत बँक सवलत आणि Realme 14 Pro वर 2,000 रुपयांची बँक सूट देत आहे. त्याची विक्री 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, Realme वेबसाइट आणि Realme ॲपवर सुरू होणार आहे. ग्राहक 16 जानेवारी ते 22 जानेवारी रोजी दुपारी 1:15 वाजेपर्यंत मर्यादित कालावधीच्या ऑफरसह स्मार्टफोनचे प्री-बुक करू शकतात.
डिस्प्ले- Realme 14 Pro मध्ये 6.6-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2392 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. त्याची कमाल ब्राईटनेस 4500 nits आहे. याला गोरिल्ला ग्लास 7i चे संरक्षण देण्यात आले आहे.
प्रोसेसर- फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट आहे, जो Mali G615 GPU सह जोडलेला आहे.
स्टोरेज- नवीनतत स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
OS- यात Realme UI 6 आधारित Android 15 OS आहे.
कॅमेरा- यात 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
बॅटरी- Realme 14 Pro मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
डिस्प्ले – Realme 14 Pro+ फोनमध्ये 6.83 इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800 X 1272 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
प्रोसेसर- फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. जे Adreno GPU सह जोडलेले आहे.
स्टोरेज- Realme 14 Pro+ स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या पर्यायांंमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Samsung लाँच करणार बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन, पावरफुल फीचर्ससह लवकरच होणार एंट्री
कॅमेरा- Realme 14 Pro+ मध्ये सेल्फीसाठी 50MP Sony IMX8986 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग- फोनमध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
इतर वैशिष्ट्ये – यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरिओ स्पीकर, IP69, IP68 आणि IP66 चे रेटिंग आहे.