Samsung लाँच करणार बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन, पावरफुल फीचर्ससह लवकरच होणार एंट्री
22 जानेवारी रोजी स्मार्टफोन आणि टेक कंपनी सॅमसंगचा अनपॅक्ड ईव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन्स आणि स्मार्टवॉचचा समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग अनपॅक्ड ईव्हेंटमध्ये कंपनी आपली फ्लॅगशिप Galaxy S25 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये Samsung Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra हे स्मार्टफोन्स लाँच केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Oppo च्या या स्मार्टफोन्सना मिळणार ColorOS 15 अपडेट, AI फीचर्ससह परफॉर्मेंस होणार अधिक मजेदार
फ्लॅगशिप Galaxy S25 सिरीजसोबत कंपनी ईव्हेंटमध्ये दोन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. Samsung Galaxy F06 5G आणि Galaxy M06 5G या नावाने दोन्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स बाजारात लाँच केले जाऊ शकतात. सध्या या दोन्ही स्मार्टफोन्सवर कंपनी काम करत आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सचे डिटेल्स कंपनीने अद्याप शेअर केले नसले तरी देखील काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy F06 5G आणि Galaxy M06 5G या दोन्ही स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यावर विश्वास ठेवला तर Samsung Galaxy F06 5G आणि Galaxy M06 5G हे दोन्ही स्मार्टफोन भारतात देखील लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार, Galaxy F06 5G आणि Galaxy M06 5G हे दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन्स SM-E066B/DS आणि SM-M066B/DS या मॉडेल क्रमांकांसह BIS सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आले आहेत. हे मॉडेल क्रमांक Galaxy F06 5G आणि Galaxy M06 5G लाँचचे संकेत देतात. मॉडेल क्रमांकासह DS देखील मेंशन केला आहे, जो ड्युअल सिमकडे निर्देश करतो.
BIS सर्टिफिकेशनवर दोन्ही स्मार्टफोन्सबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली नाही, मात्र देखील हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. Samsung चे हे दोन्ही स्मार्टफोन Galaxy F05 5G आणि Galaxy M05 5G चे उत्तराधिकारी म्हणून लाँच केले जाणार आहेत. Galaxy F05 5G आणि Galaxy M05 5G हे स्मार्टफोन्स गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आले होते.
सॅमसंग अनपॅक्ड ईव्हेंटमध्ये लाँच केल्या जाणाऱ्या Galaxy F06 5G आणि Galaxy M06 5G या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोन्समध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवरसाठी, यात 25W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000 mAh बॅटरी आहे. त्यामुळे बजेट सेमगेंटमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Upcoming Devices: 2025 मध्ये Apple चे हे बहुप्रतिक्षित डिव्हाईस होणार लाँच, iPhone 17 चा बोलबाला
Samsung Galaxy F05 स्मार्टफोनमध्ये Galaxy F05 फोन 6.7 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सना मोठ्या स्क्रीनसह फोटो व्हिडीओ पाहण्यात मजा येते. फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यासाठी 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.