लवकरच लाँच होणार अॅपलचा नवीन Macs, मिळणार सिम कार्ड सपोर्ट! Wi-Fi ची गरज नाही
टेक जायंट कंपनी अॅपल एका खास गॅझेटवर काम करत आहे. हे अॅपलचं गॅझेट म्हणजे एक नवीन मॅकबुक असणार आहे. अॅपल एका रोमांचक नवीन गॅझेटवर काम करत आहे. कंपनी काही काळापासून स्वतःचे सेल्युलर मॉडेम विकसित करत आहे आणि अहवालानुसार, कंपनी लवकरच बिल्ट-इन सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह नवीन मॅकबुक लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मॅकबुकची खास गोष्ट म्हणजे यामध्ये सिमकार्ड सपोर्ट दिला जाणार आहे. त्यामुळे या मॅकबुकसाठी वायफायची गरज लागणार नाही. यामुळे आता अॅपल युजर्स या नवीन गॅझेटची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, अॅपल आपल्या मॅकबुकमध्ये सेल्युलर कनेक्टिव्हिटी देण्याचा विचार करत आहे. ज्याद्वारे वापरकर्ते वाय-फाय कनेक्टिव्हिटीशिवाय मॅकबुकमध्ये इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील. या गॅझेटमुळे युजर्सना प्रचंड फायदा होणार आहे. ज्या लोकांना प्रवासात मॅकबुक वापरताना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा सामना करावा लागतो, अशा लोकांसाठी हे नवीन मॅकबुक अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
याव्यतिरिक्त, अॅपल भविष्यातील हेडसेटमध्ये सेल्युलर वैशिष्ट्ये जोडण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये Vision Pro XR हेडसेटच्या अपडेटचा समावेश आहे. कंपनीची ही योजना यशस्वी झाल्यास नवीन मॅकबुक आयफोन, आयपॅड आणि अॅपल वॉच सारख्या अॅपल उपकरणांच्या यादीत सामील होईल. हे सर्व सेल्युलर नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात.
हे सेलुलर-इनेबल्ड मॅकबुक किमान 2026 पर्यंत उपलब्ध होणार नाहीत. कारण तोपर्यंत ॲपल एक अपग्रेडेड मॉडेम लाँच करण्याचा विचार करत आहे जो फास्ट इंटरनेट स्पीड देईल. सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह मॅकबुक असणे ही एक मोठी प्रगती आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मॅकबुक वापरताना वाय-फाय शोधण्याची चिंता नाही.
सध्या, मॅकबुक वापरकर्ते त्यांच्या आयफोनच्या मोबाइल डेटाद्वारे इंटरनेटचा वापर करू शकतात. परंतु, बिल्ट-इन सेल्युलर कनेक्टिव्हिटी मॅकबुकची योजना अधिक चांगली असेल. विशेषतः जर तुम्हाला तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ आणि डेटा मर्यादा वाचवायची असेल, तर हे नवीन मॅकबुक फायदेशीर ठरणार आहे.
Year Ender 2024: 2024 मध्ये Google वर सर्वात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या
अॅपलचं नवीन मॅकबुक प्रत्येक युजरसाठी फायदेशीर ठरणार आहे. पण हे मॅकबुक कधी लाँच होणार, त्याची किंमत काय असणार, त्याचे फीचर्स काय असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या नवीन मॅकबुकमुळे युजर्सना फायदा होणार एवढं नक्की. नवीन मॅकबुकमुळे तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी शोधण्याची गरज लागणार नाही.
ॲपल कंपनीने त्यांच्या प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम, iOS 18.2, iPadOS 18.2, macOS 15.2 आणि इतरांच्या रिलीज कँडिडेट (RC) वर्जन जारी केले आहेत. नवीन रिलीझ कँडिडेटमध्ये iOS 18.2, iPadOS 18.2, macOS Sequoia 15.2, visionOS 2.2 आणि tvOS 18.2 यांचा समावेश आहे.