सावधान! तुम्हालाही JIO चा हा मॅसेज आलाय का? थांबा, अन्यथा रिकामं होईल Bank Account
देशात ऑनलाईन फसवूणकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे. डिजिटल अरेस्ट, व्हाट्सअॅप वीडियो कॉल स्कॅम, यूपीआय फ्रॉड, ऑनलाइन शॉपिंग स्कॅम, फिशिंग, अशा घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे. ज्यांना या स्कॅमबद्दल माहिती नाही, अशी लोकं सायबर स्कॅमर्सच्या बोलण्याला बळी पडतात. ज्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
IRCTC DOWN: एका महिन्यात तिसऱ्यांदा ठप्प झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करण्यात येतात अडचणी
स्कॅमर्स वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. स्कॅमर्स अनेकदा बँक कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही सरकारी एजन्सीचे अधिकारी म्हणून ओळख दाखवून लोकांना कॉल करतात आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. पण, आता स्कॅमर्सनी देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओलाही सोडलं नाही. स्कॅमर्स Jio चे नाव वापरून लोकांना बनावट संदेश पाठवत आहेत.(फोटो सौजन्य – pinterest)
सध्या सुरु असणाऱ्या या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये एक नवीन स्कॅम अॅड झाला आहे. हा स्कॅम म्हणजे जिओचा फेक मॅसेज. अनेकांना जिओच्या नावाने एक मॅसेज केला जात आहे, ज्यामध्ये एक फाईल आहे. ही फाईल आपण आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमध्ये व्हायरस जाऊ शकतो. याबाबत सायबर दोस्तने एक पोस्ट शेअर करून अलर्ट जारी केला आहे.
फेक मॅसेजमध्ये शेअर करण्यात आलेली एपीके फाइल फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर यूजरचा मोबाइलही हॅक होऊ शकतो. त्यामुळे सायबर दोस्तने एक पोस्ट शेअर करत सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पोस्टमध्ये लोकांना जिओच्या नावाने येणाऱ्या फेक मॅसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये लोकांना APK फाईल डाउनलोड करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे, कारण यामुळे तुमचा मोबाइल फोन हॅक होऊन तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो.
सावधान! 🚨
“Jio internet speed #5G network connection.apk” जैसे फाइल को डाऊनलोड न करें। यह एक खतरनाक फाइल है जो आपके फोन को हैक कर सकती है और आपका डेटा चुरा सकती है। सुरक्षित रहने के लिए केवल आधिकारिक ऐप स्टोर से ही ऐप्स डाउनलोड करें।#APKFileScam pic.twitter.com/9TjAOuvSLA
— Cyber Dost (@Cyberdost) December 29, 2024
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सायबर दोस्तने म्हटले आहे की “सावधगिरी बाळगा! “Jio internet speed #5G network connection.apk” सारखी फाईल डाउनलोड करू नका. ही एक धोकादायक फाईल आहे जी तुमचा फोन हॅक करू शकते. सुरक्षित रहा, फक्त अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा.
मालवेअर इतर ॲप्सप्रमाणे होमस्क्रीनवर दिसत नाही आणि फोनमध्ये लपतो. त्यामुळे लोकांना याची माहिती मिळत नाही. पण, तो तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतो, ज्याचा वापर करून तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो.
Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?
जिओ देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. त्याचे देशभरात करोडो वापरकर्ते आहेत. जिओ त्याच्या उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेटसाठी प्रसिद्ध आहे. जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे.