Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2025: तुमच्या ‘स्पेशल वन’ला गिफ्ट करा Apple चे हे प्रोडक्ट्स, तुमचा दिवस होईल अविस्मरणीय

फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. हा महिना प्रियकर आणि प्रेयसी किंवा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसाठी खूप खास आहे. दरवर्षीप्रमाणे, 2025 चा व्हॅलेंटाईन वीक देखील 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2025 | 03:11 PM
Valentine's Day 2025: तुमच्या 'स्पेशल वन'ला गिफ्ट करा Apple चे हे प्रोडक्ट्स, तुमचा दिवस होईल अविस्मरणीय

Valentine's Day 2025: तुमच्या 'स्पेशल वन'ला गिफ्ट करा Apple चे हे प्रोडक्ट्स, तुमचा दिवस होईल अविस्मरणीय

Follow Us
Close
Follow Us:

7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. आणि 14 फेब्रुवारी रोजी प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. खरं तर फेब्रुवारीचा महिना प्रेमाचा महिना मानला जातो. या दिवसांत प्रियकर आणि प्रेयसी किंवा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड एकमेकांना गिफ्ट देतात. तुम्ही देखील तुमच्या स्पेशल वनला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल आणि काय गिफ्ट द्यावे हे तुम्हाला समजत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

Shein is back: बॅन झालेला Chinese App पुन्हा भारतात लाँच, Reliance चा प्लॅन नेमका आहे तरी काय? जाणून घ्या

व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तिंना Apple चे काही खास प्रोडक्ट्स गिफ्ट देऊ शकता, ज्यामुळे तुमचा दिवस अजून स्पेशल होऊ शकतो. Apple चे प्रोडक्ट्स म्हणजे केवळ तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग नसेल तर एक अर्थपूर्ण भेट देखील ठरणार आहे. जी तुमच्य पार्टनरसाठी फायद्याची ठरू शकते. व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणते अ‍ॅपल प्रोडक्ट्स भेट देऊ शकता, याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

iPhone 16

अलीकडेच लाँच करण्यात आलेला iPhone 16 तुम्ही तुमच्या स्पेशल वनला भेट देऊन व्हॅलेंटाईन डे खास बनवू शकता. यात 6.1-इंचाचा OLED पॅनेल आहे, जो ट्रू टोन आणि HDR डिस्प्लेला सपोर्ट करतो. अ‍ॅपल इंटेलिजेंस फीचर्सना सपोर्ट करण्यासाठी हे A18 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. iPhone 16 हा 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते.

Apple Watch SE

आरोग्य आणि निरोगीपणाचा साथीदार म्हणून, तुम्ही व्हॅलेंटाईन डे तुमच्या प्रिय व्यक्तिला Apple Watch SE देखील भेट देऊ शकता. स्लीप ट्रॅकिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे अनेक फीचर्स त्यात उपलब्ध आहेत. मनगटाचे सौंदर्य वाढवण्यासोबतच ते तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या आरोग्यावरही लक्ष ठेवेल. त्याची किंमत 24,900 रुपयांपासून सुरू होते.

AirPods 4

जर तुमच्या व्हॅलेंटाईनला गाणी ऐकण्याची आवड असेल तर AirPods 4 पेक्षा चांगलं गिफ्ट असूच शकत नाही. व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला AirPods 4 भेट देऊन हा दिवस त्याच्यासाठी अधिक खास बनवू शकता. कंपनीच्या या प्रोडक्टमध्ये पर्सनलाइज्ड स्पेटियल ऑडियो आणि डायनॅमिक हेड ट्रॅकिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला 17,900 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

HomePod Mini

HomePod Mini मध्ये सिंगल फुल-रेंज ड्रायव्हर, ड्युअल पॅसिव्ह रेडिएटर्स आणि 4 मायक्रोफोन आहेत. हे कंप्यूटेशनल ऑडिओला समर्थन देते आणि 360 डिग्री साउंड वितरीत करते. सिरी व्हॉइस कमांड वापरून ते नियंत्रित केले जाऊ शकते. स्मार्ट होम फीचर्स नियंत्रित करण्यापासून ते हँड्स-फ्री कॉल्सपर्यंत, ते अनेक फीचर्स देते. याची किंमत 10,900 रुपये आहे.

Deva Leaked Online: शाहीद कपूरचा ‘देवा’ चित्रपट ऑनलाईन लीक, डाऊनलोड करण्याची चूक केली तर होईल पश्चाताप

MacBook Air M3

MacBook Air M3 ही अशी भेट आहे जी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला अनेक वर्षे आठवणीत राहिल. अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह आणि शक्तिशाली परफॉर्मेंससह, MacBook Air M3 क्रिएटिविटी आणि प्रोडक्टिविटी एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल. त्याची सुरुवातीची किंमत 1,14,900 रुपये आहे. याशिवाय, तुम्ही iPad Air किंवा iPad Mini देखील भेट देऊ शकता. Apple App Store च्या मदतीने तुम्ही Apple उत्पादनांवर तुमचे आवडते नाव आणि नंबर इत्यादी लिहू शकता.

Web Title: Tech news gift this apple products to your love one on the occasion of valentines day 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • Valentine Day
  • valentine day gift

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.