Shein is back: बॅन झालेला Chinese App पुन्हा भारतात लाँच, Reliance चा प्लॅन नेमका आहे तरी काय? जाणून घ्या
चीनी फास्ट-फॅशन ब्रँड ॲप Shein ने पुन्हा भारतात एंट्री केली आहे. 2020 भारत सरकारने जवळपास 50 चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. बंदी घालण्यात आलेल्या चिनी ॲप्समध्ये Shein चा देखील समावेश होता. मात्र आता Shein पुन्हा भारतात आला आहे. जवळपास 5 वर्षांनंतर Shein ने भारतात पुनरागमन केले आहे.
या दिवशी लाँच होणार Google Pixel 9a, अशी असेल नवीन डिझाईन! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारत-चीन तणावामुळे 2020 मध्ये Shein वर बंदी घालण्यात आली होती, परंतु आता रिलायन्स रिटेलच्या भागीदारीत हे ॲप पुन्हा लाँच करण्यात आले आहे. रिलायन्स रिटेलच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून या निर्णयामागे रिलायन्स रिटेलची नेमकी काय योजना आहे, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. Shein पुन्हा भारतात लाँच करण्यापूर्वी एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार, रिलायन्सला ऑपरेशन्स आणि डेटावर संपूर्ण नियंत्रण देण्यात आले आहे, तर Shein केवळ तंत्रज्ञान भागीदार म्हणून काम करेल. ग्राहकांचा डेटा फक्त भारतातच स्टोअर केला जाईल आणि Shein ला त्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे Shein चा वापर करताना भारतीयांना कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावेळी Shein इंडिया फास्ट फॅशन ॲप रिलायन्स रिटेलनेच विकसित केले आहे आणि परवाना करारांतर्गत लाँच केले गेले आहे. साधारणपणे, चायनीज ॲप्स डेटा स्टोरेजच्या संदर्भात टीकेने घेरले जातात. वास्तविक, चीनमध्ये कडक सायबर सुरक्षा कायदे आहेत, त्यामुळे कंपन्यांना तेथील सरकारसोबत डेटा शेअर करावा लागतो. पण आता झालेल्या करारानुसार, Shein चा वापर करणाऱ्या भारतीय नागरिकांचा डेटा केवळ भारतातच स्टोअर केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्सने शनिवारी हे ॲप पुन्हा लाँच केले. रिलायन्सने याबाबत कोणतेही विशेष मार्केटिंग केलेले नाही किंवा कंपनीने अद्याप त्याच्या लाँचबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. रिलायन्सने काही काळापूर्वी आपल्या अजियो स्टोअरमध्ये Shein उत्पादनांची विक्री सुरू केली होती. रिलायन्सला आता या ॲपद्वारे ई-कॉमर्स मार्केटमध्ये आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे. किंबहुना, भारताचे वेगवान फॅशन मार्केट वेगाने वाढत आहे आणि 2030-31 पर्यंत $50 बिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशावेळी, Shein च्या मदतीने रिलायन्स एका नव्या टप्प्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
सर्व उत्पादनांची रचना आणि निर्मिती भारतात केली जाईल. या अंतर्गत कपड्यांची किंमत 350 रुपयांपासून सुरू होईल, ज्यामुळे ग्राहकांना परवडणारे आणि स्टायलिश कपडे मिळू शकतील. सुरुवातीला कंपनी नवी दिल्ली आणि मुंबईसह निवडक शहरांमध्ये वितरण सेवा प्रदान करेल.
DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील युजर्सची संख्या किती?
Shein ची सुरुवात 2012 मध्ये चीनमध्ये झाली होती, परंतु आता त्याचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पाश्चिमात्य आणि ट्रेंडी कपड्यामुळे Shein लोकप्रिय झाले. तथापि, 2020 मध्ये याला मोठा धक्का बसला, जेव्हा भारत सरकारने चीनशी वाढत्या तणावादरम्यान त्यावर बंदी घातली. यानंतर, गेल्या वर्षी सरकारने सांगितले होते की रिलायन्स आणि Shein यांच्यात भागीदारी झाली आहे, याच भागिदारीचा एक भाग म्हणून Shein पुन्हा भारतात लाँच करण्यात आले आहे.