Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे चाललंय तरी काय? गुगल मॅपने पुन्हा दाखवला चुकीचा रस्ता, गोव्याला जाणारं कुटूंब जंगलात अडकलं

घनदाट जंगलात मोबाईल नेटवर्क गायब असल्याने कुटुंबीय कोणाशीही संपर्क करू शकत नव्हते. सकाळ होताच कुटुंबीयांनी आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर संपर्क साधला. गुगल मॅपमुळे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2024 | 01:00 PM
अरे चाललंय तरी काय? गुगल मॅपने पुन्हा दाखवला चुकीचा रस्ता, गोव्याला जाणारं कुटूंब जंगलात अडकलं

अरे चाललंय तरी काय? गुगल मॅपने पुन्हा दाखवला चुकीचा रस्ता, गोव्याला जाणारं कुटूंब जंगलात अडकलं

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय नेव्हिगेशन अ‍ॅप गुगल मॅपमुळे पुन्हा एक घटना घडली आहे. गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यानुसार बिहारवरून एक कुटूंब गोव्याला जात होते. मात्र त्यांनी गुगल मॅपवर दाखवल्या प्रमाणे शॉटकर्ट घेतला आणि त्यांची गाडी जंगलात अडकली. या कुटूंबियांनी जगंलातून बाहेर येण्यासाठी पोलिसांना फोन केला. व त्यानंतर पोलिसांनी कुटुंबाची जंगलातून सुखरूप सुटका केली.

Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारहून गोव्याला जाणारे एक कुटुंब गुगल मॅपवर अवलंबून राहून प्रवास करत होते. यावेळी त्यांना कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील भीमगढ जंगलात शॉर्टकटच्या सूचना मिळाल्या. त्यामुळे गुगल मॅपवर दाखवल्या गेलेल्या मार्गाप्रमाणे चालकाने गाडी वळवली. मात्र हा शॉटकर्ट त्यांना थेट जंगलात घेऊन गेला. शिरोली आणि हेमडगा परिसरातील या अवघड मार्गावर गुगल मॅपने त्यांना सुमारे 8 किलोमीटर आत नेऊन अडचणीत आणले. यावेळी घनदाट जंगल परिसर आणि खराब रस्ते हे कुटुंबासाठी आव्हान बनले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

नेटवर्क विजेशिवाय काढावी लागली रात्र

घनदाट जंगलात मोबाईल नेटवर्क गायब असल्याने कुटुंबीय कोणाशीही संपर्क करू शकत नव्हते. यानंतर, जंगलातील शांतता आणि अज्ञात धोक्यांनी वेढलेल्या कुटुंबाला त्यांच्या कारमध्ये रात्र काढावी लागली. रात्री जंगलातून बाहेर येण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नसल्याने त्यांना सकाळची वाट पहावी लागली.

पोलिसांनी कुटुंबाची जंगलातून सुखरूप सुटका केली

सकाळ होताच कुटुंबीय नटवर्कच्या शोधात गेले. यानंतर गाडी अडकलेल्या ठिकाणापासून त्यांना 4 किलोमीटर अंतरावर मोबाईल नेटवर्क सापडलं. त्यानंतर कुटूबियांनी तात्काळ आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत कुटुंबाला जंगलातून सुखरूप बाहेर काढले.

Google Map Update: गुगल मॅप्समध्ये होतोय मोठा बदल, आत्ताच हे काम करा नाहीतर लोकेशन हिस्ट्री होईल डिलीट

यापूर्वीही अशा धोकादायक घटना घडल्या आहेत

गुगल मॅपच्या चुकीने लोकांना अडचणीत टाकण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्याच्या शेवटी आणि या महिन्याच्या सुरुवातीला गुगल मॅपमुळे अपघाताच्या दोन घटना घडल्या होत्या. एका घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर एका घटनेत तिघेजण जखमी झाले होते. या घटनांची चौकशी सुरु करण्यात आली असून गुगल मॅपवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गुगल मॅपमुळे तिघांचा मृत्यू

तिघे मित्र त्यांच्या गाडीमधून लग्नासाठी जात होते. त्यांनी रस्त्याच्या मार्गदर्शनासाठी गुगल मॅपची मदत घेतली होती. यावेळी गुगल मॅपने पुलावरून जाण्याचा रस्ता दाखवला. मात्र हा पुल तुटलेला होता. पुलावर गाडी नेताच गाडी नदीत पडली आणि गाडीमधील तिघांचा मृत्यू झाला.

बरेलीच्या बडा बायपास येथे दुसरा अपघात

मोबाईल फोनमध्ये गुगल मॅप वापरून गाडीमधील तिघेजण पिलीभीतला जात होते. बरेलीच्या बडा बायपासला येताच गुगल मॅपवर त्यांना शॉटकर्ट दिसला. या शॉटकर्ट रस्त्यावर गाडी नेताच त्यांची गाडी कालव्यात पडली. या अपघातात गाडीमधील तिघेजण जखमी झाले.

Web Title: Tech news google map update ujjain family was following google maps for direction to goa but gets lost in karnataka jungle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 01:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.