Google Map Update: गुगल मॅप्समध्ये होतोय मोठा बदल, आत्ताच हे काम करा नाहीतर लोकेशन हिस्ट्री होईल डिलीट
गुगल मॅप युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. गुगल मॅप्सने त्यांच्या लोकेशन हिस्ट्रीच्या नियमांत बदल केला आहे. यासंदर्भात कंपनी प्रत्येक गुगल मॅप युजरला मेल करत आहे आणि गुगल मॅप सेटिंग अपडेट करण्यासाठी सांगत आहे. वास्तविक, कंपनी लोकेशन हिस्ट्री सेव्ह करण्याच्या पद्धतीत बदल करणार आहे.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅपने गेल्या वर्षी घोषणा केली होती की युजर्स एकतर त्यांचा टाइमलाइन डेटा डिव्हाइसवर सेव्ह करू शकतात किंवा क्लाउडवर एन्क्रिप्टेड स्वरूपात त्याचा बॅकअप घेऊ शकतात. आता लवकरच हा नियम लागू केला जाणार आहे. युजर्सनी त्यांच्या डिव्हाईसवर ही सेटिंग अपडेट केली नाही, तर त्यांची लोकेशन हिस्ट्री डीलीट होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल आता ईमेलद्वारे युजर्सना या नियमासंदर्भात माहिती देत आहे. गुगलने मेलमध्ये म्हटलं आहे की, युजर्सना जर त्यांची लोकेशन हिस्ट्री सेव्ह करायची असेल तर त्वरीत सेटिंग अपडेट करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा डेटा डिलीट केला जाईल. तथापि, प्रत्येक युजरसाठी डेटा डिलीट करण्याची अंतिम मुदत वेगळी असू शकते.
गुगल आता प्रत्येक डिव्हाइससाठी लोकेशन डेटा स्वतंत्रपणे सेव्ह करेल. याचा अर्थ तुमची टाइमलाइन यापुढे वेबशी इंटीग्रेट केली जाणार नाही. तुम्ही याबाबत अॅपमध्ये अपडेट न केल्यास गुगल प्रथम मागील 3 महिन्यांचा डेटा डिलीट करेल. यानंतर नवीन लोकेशन हिस्ट्री फक्त डिव्हाइसवर लोकली सेव्ह होईल.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅप सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका अपघातामुळे सर्वत्र गुगल मॅप्सची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी चुकीच्या मार्गाने तीन मित्रांची कार एका पुलावरून पडली होती. त्यामुळे तिन्ही मित्रांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गुगल मॅप चांगलाच चर्चेत आला. आपल्या प्रवासासाठी गुगल मॅप किती योग्य आहे, याबाबत आता चर्चा सुरु आहे. गुगल मॅप तुमच्या अनेक क्रियाकलापांवर लक्ष ठेवतो. तुम्ही कोणत्या वेळी कुठे गेला होता हे गुगलला माहीत आहे. तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी गुगल जीपीएसची मदत घेते.