Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत
गुगल मॅप आपल्याला आपल्या प्रत्येक प्रवासात मदत करतो. गुगल मॅप आपल्याला प्रवासावेळी रस्ता दाखवतो, ज्यामुळे आपला प्रवास अधिक सोपा होता. गुगल मॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट लाँच करत असते, ज्यामुळे युजर्सचा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो. गुगल मॅप मार्ग दाखवण्यासोबतच तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी देखील मदत करणार आहे.
Realme Neo 7 चे Bad Guys लिमिटेड एडिशन या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
आपण कुठेही जाताना आपल्याला टोल भरावा लागतो. पण आता गुगल मॅप तुम्हाला टोलचे पैसे वाचवण्यासाठी मदत करणार आहे. इतर फीचर्ससोबतच आता गुगल मॅपच्या मदतीने आपले पैसे देखील वाचणार आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप अर्थात गुगल मॅपच्या काही ट्रीक्सच्या मदतीने तुम्ही ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता, तसेच टोलचे पैसे देखील वाचवू शकता. आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते एका सोप्या ट्रीकच्या मदतीने महामार्ग आणि टोल प्लाझा टाळू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपमधील तुम्ही सेव्ह केलेली ही सेटिंग्ज भविष्यातील सर्व सहलींसाठी लक्षात ठेवा. तुम्ही गुगल मॅपमध्ये ऑन केलेल्या या सेटिग्जनंतर अॅपमध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला असे मार्ग दाखवेल ज्यात टोल आणि महामार्ग नसतील. ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. लक्षात ठेवा की तुम्ही गुगल मॅपमधील ही सेटिंग्ज कधीही बदलू शकता आणि मूळ सेटिंग्जवर परत जाऊ शकता.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की टोलचा मार्ग टाळून इतर मार्ग निवडणे म्हणजे नेहमीच पैशाची बचत करणं. हे फीचर विशेषत: त्या लोकांसाठी फायद्याचं ठरणार आहे जे दररोज टोल बूथ फी भरतात. याशिवाय, महामार्गाचा मार्ग न घेतल्याने, तुम्ही गर्दीचे मार्ग टाळू शकता आणि ज्या मार्गांवर अधिक निसर्गसौंदर्य आणि स्थानिक बाजारपेठा आहेत त्या मार्गांवरून तुमचा प्रवास होऊ शकतो.
याशिवाय दुचाकीस्वारांसाठी पैसे वाचवण्याचा हा एक स्मार्ट मार्ग आहे. ज्यांना मंद गतीने गाडी चालवणे आवडते त्यांच्यासाठीही गुगल मॅपच्या या सेटिंग्ज उपयुक्त आहेत. हे लक्षात ठेवा की टोल वाचवणे आणि महामार्गाव्यतिरिक्त इतर मार्ग घेणे यामुळे तुम्ही तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवू शकता.