Realme Neo 7 चे Bad Guys लिमिटेड एडिशन या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Realme ने अलीकडेच Realme Neo 7 हा नवीनतम स्मार्टफोन लाँच केला आहे. यानंतर आता कंपनी Realme Neo 7 चे Bad Guys लिमिटेड एडिशन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत कंपनीने माहिती दिली असून या नवीन एडीशनची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या डिझाईनचे काही फोटो देखील सोशल मिडीयावर शेअर करण्यात आले आहेत.
Realme लवकरच Realme Neo 7 स्मार्टफोनचे “द बॅड गाईज लिमिटेड एडिशन” लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवीन स्मार्टफोन स्वॉर्ड सोल सिल्व्हर कलरमध्ये लाँच केला जाणार आहे. ब्रँडने या डिव्हाइसची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. स्मार्टफोनचे नवीन एडीशन 3 जानेवारीला चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
चीनमध्ये 3 जानेवारीला Realme Neo 7: Bad Guys Limited Edition लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या डिझाईनची इंस्पिरेशन लॉन्गक्वान तलवारपासून घेण्यात आली आहे. जी स्मार्टफोनच्या चमकदार सिल्वर स्टॅम्पिंग प्रोसेसने रिफ्लेक्ट होते. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस माइक्रो-इंग्रेवड पॅटर्न आहे. याशिवाय हे स्पेशल एडिशन कस्टमाइज सिस्टम एलिमेंट्ससोबत लाँच केले जाणार आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनचा लूक अधिक चांगला होता.
युजर्सना एक आकर्षक अनुभव देण्यासाठी, या स्मार्टफोनमध्ये यूनीक आयकॉन, डायनॅमिक वॉलपेपर्स, फिंगरप्रिंट स्टाइल आणि चार्जिंग ॲनिमेशन देण्यात आले आहेत. फोनमध्ये थीम बेस्ड ॲक्सेसरीजने भरलेला एक “ट्रेजर बॉक्स” देखील समाविष्ट आहे.
डिस्प्ले – Realme Neo 7 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा BOE S2 OLED पॅनेल आहे ज्याचे रिझोल्यूशन 1.5k आणि 120Hz रीफ्रेश दर आहे.
परफॉर्मंस – स्मार्टफोनमध्ये परफॉर्मंससाठी, लिमिटेड एडिशन D9300+ चिप देण्यात आली आहे. हे 16 GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 1 TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह जोडलेले आहे.
बॅटरी – Realme Neo 7 स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 7,000 mAh बॅटरी आहे.
कॅमेरा – Neo 7 च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. फोन Android 15 वर चालतो ज्याच्या वरच्या बाजूला Realme UI 6.0 आहे.
Realme Neo 7 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच अंदाजे 24,000 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच अंदाजे 29,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच अंदाजे 32,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरियंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच अंदाजे 38,000 रुपये आहे.