iPhone 17 Pro: युनिक डिझाईन आणि नवीन चीपसह लाँच होणार iPhone 17 Pro! लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन्स लिक
टेकजायंट कंपनी अॅपल दरवर्षी त्यांची एक नवीन सिरीज लाँच करत असते. ही सिरीज भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लाँच केली जाते. अॅपलने काही महिन्यांपूर्वी त्यांची नवीन सिरीज आयफोन 16 लाँच केली आहे. यानंतर आता आयफोन 17 ची घोषणा करण्यात आली आहे. आयफोन 17 सिरीज 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते. आयफोन 16 च्या लाँचिंगनंतर आता सर्वजण आयफोन 17 सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाँचिंगपूर्वी या सिरीजमधील आयफोन17 प्रोचे काही डिटेल्स लिक झाले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीने आयफोन 15 प्रो आणि आयफोन 16 प्रो मध्ये टायटॅनियम फ्रेम वापरली होती. मात्र आयफोन 17 प्रो ॲल्युमिनियम फ्रेमसह लाँच केला जाऊ शकतो. फोनच्या मागील पॅनलमध्ये ग्लास आणि ॲल्युमिनियमचे मिश्रण पाहिले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, कॅमेरा बंप मोठा असेल आणि तो ॲल्युमिनियमचा असेल, ज्यामुळे तो मागील मॉडेलच्या तुलनेत वेगळा दिसेल.
आयफोन 17 प्रोमध्ये अॅपलची नवीन A19 प्रो चिप असण्याची अपेक्षा आहे, जी TSMC च्या 3nm तंत्रज्ञानावर आधारित असेल. हे परफॉर्मंस आणि पावर एफिशिएंसी सुधारेल. यासोबतच अॅपलने डिझाइन केलेली Wi-Fi 7 चीप देखील आयफोन 17 प्रोमध्ये दिसू शकते.
आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्सला 12GB रॅम दिली जाऊ शकते, जी आयफोन 16 प्रोच्या 8GB RAM पेक्षा जास्त आहे. हे अपग्रेड मल्टीटास्किंग आणि अॅपलच्या AI-आधारित वैशिष्ट्यांना सपोर्ट करणार आहे.
आयफोन 17 सिरीजमध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड पाहिला जाऊ शकतो. फ्रंट कॅमेरा 12MP वरून 24MP पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रो मॉडेल्समध्ये टेलिफोटो कॅमेरा 48MP पर्यंत अपग्रेड केला जाऊ शकतो. यामुळे फोटोग्राफीचा अनुभव आणखी सुधारेल. आयफोन त्याच्या कॅमेरा क्वालिटीसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. अशातच आता त्याच्या नवीन सिरीजमधील कॅमेरा अपग्रेड सर्वांना आकर्षित करू शकतो.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
प्रो मॅक्स मॉडेलमध्ये एक लहान डायनॅमिक आयलँड प्रदान केले जाऊ शकते, जे स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सुधारेल. फेस आयडी सिस्टमच्या मेटा लेन्सच्या वापरामुळे हा बदल शक्य होऊ शकतो. ही सर्व संभाव्य वैशिष्ट्ये आहेत. अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आयफोन 17 प्रोबद्दल, असा अंदाज वर्तवला जात आहे की तो 2025 मध्ये लाँच होईल.
कंपनीने सप्टेंबर महिन्यात आपली नवीन आयफोन सीरिज आयफोन 16 लाँच केली. कंपनीने आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स असे चार आयफोन लाँच केले आहेत. हे चार आयफोन भारतातही लाँच करण्यात आले आहेत. iPhone 16 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे जो OLED पॅनेल आहे.