
फोटो सौजन्य: iStock
अनेकदा प्रश्न पडतो की YouTube वर 1 लाख व्ह्यूज मिळाल्यावर आपल्याला किती पैसे मिळतात? तसेच, आपण कधी गोल्डन बटणचे हक्कदार बनतो? चला या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात.
राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली
YouTube वर उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे Google AdSense. जेव्हा तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती दिसतात आणि प्रेक्षक त्यावर क्लिक करतात किंवा पाहतात तेव्हा त्या युट्युब चॅनेलच्या मालकाला पैसे मिळतात. हे CPM (Cost Per Mille) आणि RPM (Revenue Per Mille) वापरून मोजले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रत्येक 1000 व्ह्यूजवर मिळणारी रक्कम बदलत असते.
1 लाख म्हणजेच 100,000 व्ह्यूजवर YouTube वर ठराविक कमाई होते असे नाही. ही कमाई अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की व्हिडिओचा विषय, प्रेक्षक कोणत्या देशातील आहेत, व्हिडिओची लांबी आणि त्यावर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींची संख्या. भारतात साधारणपणे 1 लाख व्ह्यूजवर 2,000 ते 8,000 रुपये इतकी कमाई होऊ शकते.
जर व्हिडिओ फायनान्स, टेक्नॉलॉजी किंवा बिझनेस यांसारख्या हाय CPM कॅटेगरीमध्ये असेल, तर कमाई अधिक होण्याची शक्यता असते. मात्र एंटरटेनमेंट किंवा व्लॉग्स प्रकारच्या व्हिडिओंमध्ये CPM कमी असल्याने उत्पन्न तुलनेने मर्यादित राहते.
या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. YouTube वर कमाईसाठी इतरही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. चॅनेलवर स्पॉन्सरशिप, ब्रँड डील्स, एफिलिएट लिंक आणि मेंबरशिप अशा माध्यमांतूनही उत्पन्न मिळू शकते. अनेक मोठे क्रिएटर्स व्ह्यूजपेक्षा ब्रँड डील्समधून अधिक कमाई करतात.
118 किमीची रंपाट स्पीड देणारी ‘ही’ बाईक झाली लाँच, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
YouTube वरील गोल्डन बटण हा प्रत्यक्षात YouTube क्रिएटरसाठी एक मानाचा पुरस्कार आहे. जेव्हा एखादे चॅनेल 10 लाख सबस्क्राइबरपर्यंत पोहोचते तेव्हा हा गोल्डन बटन दिला जातो. तो सबस्क्राइबरच्या संख्येवर आधारित असतो, व्ह्यूजवर नाही.
एक लाख सबस्क्राइबरपर्यंत पोहोचल्यावर सिल्व्हर बटण दिले जाते, तर 10 लाख सबस्क्राइबरपर्यंत पोहोचल्यावर गोल्डन बटण दिले जाते. 1 कोटी सबस्क्राइबरपर्यंत पोहोचल्यावर डायमंड बटण दिले जाते आणि याच्या पुढील टप्प्यासाठी रेड डायमंड पुरस्कार दिला जातो.