IRCTC DOWN: IRCTC ची सेवा पूर्वरत, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी डाऊन होती वेबसाइट
भारतीय रेल्वेची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा IRCTC आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठप्प झाली होती. आज 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता IRCTC ची वेबसाईट ठप्प झाली होती. आता ही वेबसाईट पूर्वरत झाली आहे. सकाळी ही वेबसाईट ठप्प झाली होती, त्यामुळे युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. युजर्सनी IRCTC ला टॅग करत सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
AI चॅटबॉट्सना चुकूनही सांगू नका ही माहिती, आयुष्यभर कराल पश्चाताप! बँक अकाऊंटही होईल रिकामं
डिसेंबर महिन्यात IRCTC वेबसाईट तीनवेळा ठप्प झाली होती. ज्यामुळे युजर्स प्रचंड वैतागले होते. तात्काळ तिकीट बुकींगच्या वेळी वेबसाईट डाऊन झाल्याने युजर्सला तिकीट बुक करण्यात अडचणी येत होत्या. यानंतर आज पुन्हा IRCTC ची वेबसाईट डाऊन झाली होती. तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी IRCTC सेवा डाऊन का होत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे ? IRCTC वेबसाइट आणि ॲप डाऊन झाल्यामुळे लाखो यूजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले. (फोटो सौजन्य – X)
Irctc web site says service is down but now no seat available. How it’s done if server is down and no one suppose to login then how all tickets gone pic.twitter.com/uWsWlKvhjH
— VIP_In (@VIP_endia) January 1, 2025
Once again irctc server down during tatkal hours. Good job @IRCTCofficial https://t.co/Y8TjvJuyQS
— Satheesh Kumar (@satheeshkumarm6) January 1, 2025
Another day, another IRCTC app crash! 🚂💔 Tatkal booking chaos continues as the app goes down.Passengers are frustrated and demand a reliable #IRCTCServerDown
— 4uyasin (@4uyasin) January 1, 2025
“Hey @IRCTCofficial, your app/website is down! Unable to book both Tatkal & normal tickets. Please resolve the issue ASAP to avoid inconvenience to passengers. #IRCTC #TicketBooking #AppDown #WebsiteIssue” pic.twitter.com/3Ya0nPQ1Lm
— bhanu_bhogadi (@deepak060701) January 1, 2025
‘तुम्हाला कोणतेही तिकीट रद्द करायचे असल्यास किंवा TDR फाइल करायचा असल्यास, कृपया 14646,0755-6610661 आणि 0755-4090600 किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा, IRCTC वेबसाइट आणि ॲप ओपन केल्यानंतर हा संदेश स्क्रीनवर येत होता.
क्रशची Instagram Story पाहायची? तेही तिला कळू न देता! ह्या ट्रिक्स करतील तुम्हाला मदत
IRCTC वेबसाइट आणि ॲप डिसेंबर महिन्यात तीनवेळा बंद झाली होती. 9 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला IRCTC सेवा विस्कळीत झाली होती. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आलेल्या मेसेजनुसार ही समस्या मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीमुळे आली होती. याबाबत तक्रारी करण्यासाठी प्रवाशांनी सोशल मीडियाची मदत घेतली. अनेक वापरकर्त्यांनी असा आरोप केला की सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर बुकिंगसाठी फक्त प्रीमियम तिकिटेच उपलब्ध राहिली आहेत.