वर्षभर रिचार्जचं नो टेंशन! हे आहेत Jio चे लाँग टर्म वॅलिडिटीवाले बेस्ट प्लॅन, कमी पैशांत मिळणार उत्तम फायदे
महागड्या रिचार्ज प्लॅनसोबतच जिओच्या पोर्टफोलिओमध्ये असं अनेक प्लॅन्स आहेत, जे त्यांच्या युजर्ससाठी फायदेशीर आहेत. हे प्लॅन संपूर्ण वर्ष म्हणजेच 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये युजर्सना डेटा, एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग यासारखे फायदे बरेच फायदे उपलब्ध असणार आहेत. या रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला वर्षभर कोणत्याही रिचार्ज प्लॅनची गरज भासणार नाही.
Redmi Note 13: Note 14 लाँच होताच Note 13 झाला स्वस्त! कसा घ्याल ऑफर्सचा फायदा, जाणून घ्या
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांच्या युजर्ससाठी अनेक प्रीपेड योजना आहेत. या सर्व प्लॅन्सची व्हॅलिडीटी एका वर्षाची आहे. जर हे रिचार्ज प्लॅन सक्रिय झाले तर तुम्ही वर्षभर तणावमुक्त राहू शकता. यापैकी, एक प्लॅन असा देखील आहे जो दीर्घकालीन व्हॅलिडीटीसह दररोज 2.5GB पर्यंत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सुविधा ऑफर करतो. चला तर मग जिओच्या या 365 दिवस व्हॅलिडीटी असणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
ज्यांना सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो अशा युजर्ससाठी जिओचा 3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सर्वोत्तम आहे. यामध्ये संपूर्ण वर्षभरासाठी 912 GB डेटा रोलआउट केला जातो. यामध्ये 365 दिवसांसाठी युजर्सना दररोज 2.5GB डेटा ऑफर केला जातो. जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर युजर्सना मोफत प्रवेश ऑफर केला जातो.
तुम्हाला Jio च्या Fancode सह प्रीपेड प्लॅन हवा असेल तर तुम्ही 3999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा विचार करू शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सारखे फायदे उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये Jio TV आणि Jio Cinema चा ॲक्सेस देखील मोफत दिला जात आहे.
तुम्ही कमी किंमतीत वर्षभराचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर जिओचा 1899 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 1899 रुपयांमध्ये तुम्हाला 11 महिन्यांसाठी म्हणजेच 336 दिवसांसाठी एकूण 24 जीबी डेटा मिळेल. यामध्ये 3600 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. हा प्लॅन लोकांसाठी सर्वोत्तम आहे जे सिम सक्रिय ठेवण्यासाठी स्वस्त योजना शोधत आहेत.
WhatsApp Update: व्हॉट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनरिड मॅसेज आणि टायपिंगसाठी आलं नवीन फीचर
तुम्ही जास्त डेटासह रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी 449 रुपयांचा प्लॅन एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा ऑफर केला जातो. यामध्ये जिओ टीव्ही आणि टीव्ही सिनेमाचा ॲक्सेस विनामूल्य आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवस आहे. याशिवाय, 1199 रुपयांमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला एक प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो.