
Huawei Mate 70 Air: एकच झलक, सबसे अलग! चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन, 6,500mAh बॅटरी आणि इतर फीचर्सने सुसज्ज
Huawei ने त्यांचा नवीन आणि आणखी एक दमदार स्मार्टफोन आता चीनमध्ये लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Huawei Mate 70 Air या नावाने लाँच करण्यात आला असून तो मिडरेंज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची जाडी केवळ 6.6mm आहे. हा एक स्लिम 5G फोन आहे. यासोबतच या नवीन स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. सध्या हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Huawei Mate 70 Air pic.twitter.com/DHHb1uSPRS — Deng Li (@MrDengLi) November 6, 2025
Huawei Mate 70 Air स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,699 म्हणजेच सुमारे 58,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,699 म्हणजेच सुमारे 58,000 आणि या डिव्हाईसच्या टॉप एंड व्हेरिअंट 16GB रॅम + 512GB स्टोरेजची किंमत CNY 5,199 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Huawei ने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. ज्यामुळे युजर्सना पैसावसूल अनुभव मिळणार आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 7-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट पाहायला मिळत आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि किरिन 9020A चिपसेट देण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोनच्या 12GB रॅमवाल्या मॉडेलमध्ये किरिन 9020B चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Huawei Mate 70 Air या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेल (f/2.4) टेलीफोटो लेंस, 8-मेगापिक्सेल (f/2.2) अल्ट्रावाइड लेंस आणि 1.5-मेगापिक्सेलचा मल्टी-स्पेक्ट्रल कलर कॅमेरा देखील पाहायला मिळत आहे. कंपनीने लेटेस्ट लाँच केलेल्या या डिव्हाईसमध्ये सेल्फीसाठी 10.7-मेगापिक्सेल (f/2.2) कॅमेरा दिला आहे.
हा फोन 4K रिजॉल्यूशनपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. याशिवाय हे डिव्हाईस AI डायनामिक फोटो, HDR, स्लो मोशन, टाइम-लैप्स, स्माइल कॅप्चर आणि व्हॉईस-एक्टिवेटेड शूटिंग मॉडेलला सपोर्ट करते. या फोनमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.