Tech Tips: Google Chrome चा वापर करून तुम्हीही वैतागला आहात का? आत्ताच ट्राय करा हे प्रायव्हसी-फ्रेंडली इंटरनेट ब्राउझर
गुगल क्रोम हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध इंटरनेट ब्राऊझर आहे. मात्र असं असलं तरी देखील या ब्राऊझरच्या प्रायव्हसीमुळे युजर्स प्रचंड वैतागले आहेत. तुम्ही देखील गुगल क्रोम युजर असाल आणि याच्या प्रायव्हसी पॉलिसीला कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला देखील असे वाटत असेल की क्रोम तुमच्या ऑनलाइन अॅक्टिविटीजवर लक्ष ठेवते, तर तुम्ही इतर पर्यायांचा वापर करू शकता. आता आम्ही तुम्हाला अशाच काही ब्राऊझरबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा वापर तुम्ही करू शकता.
ब्रेव ब्राऊझर अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आलं आहे, ज्यांना प्रायव्हसी आणि सुविधा यांच्यामध्ये समतोल ठेवायचा आहे. हे Chromium वर आधारित आहे. हा तोच प्लॅटफॉर्म आहे, जिथे Chrome बनवण्यात आला आहे. मात्र हे ब्राऊझर डिफॉल्टपणे जाहिराती आणि ट्रॅकर्सना ब्लॉक करते. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडरच्या Cover Your Tracks रिपोर्टनुसार, Brave मजबूत ट्रॅकिंग प्रोटेक्शन प्रदान करतो. यामध्ये वैयक्तिक मेसेजिंग, न्यूज, व्हिडीओ कॉलिंग आणि स्वत:चे सर्च इंजिन देखील उपलब्ध आहे. युजर्सना गरज असल्यास ते याचे क्रिप्टो रिवॉर्ड सिस्टिम बंद करू शकतात किंवा VPN सर्विस सरु करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
डकडकगो त्यांच्या प्रायव्हसी-फर्स्ट सर्च इंजिनसाठी अतिशय लोकप्रिय आहे. याचे वेब ब्राऊझर डेस्कटॉप आणि दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. Chromium वर बेस्ड हे ब्राऊझर किमान डेटा कलेक्शन करतो आणि कुकी परवानग्या ऑटोमॅटिक मॅनेज करते. यामध्ये Duck Player नावाचे एक फीचर देण्यात आले आहे. जे युट्यूब व्हिडीओ जाहिराती आणि ट्रॅकिंगशिवाय पाहण्याची परवानगी देते. यासोबतच DuckDuckGo Privacy Essentials एक्सटेंशन HTTPS कनेक्शन देखील सुरक्षित ठेवते आणि थर्ड-पार्टी ट्रॅकर्स ब्लॉक करते.
Mozilla चे Firefox दिर्घकाळापासून त्यांच्या सोर्स आणि ट्रांसपेरेंट डेवलपमेंटद्वारे डिजिटल प्रायव्हसीला प्राधान्य देत आहे. हे Chromium वर आधारित नाही. यामध्ये Enhanced Tracking Protection आणि Total Cookie Protection सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर जाहिरातींद्वारे डेटा संकलन मर्यादित ठेवते आणि सोशल मीडिया ट्रॅकर्स थांबवते. Firefox चे प्रायव्हेट ब्राऊझिंग मोड आपोआप हिस्ट्री डिलीट करते आणि युजर्सची ओळख वेबसाईटपासून लपवते.
टॉप ब्राऊझर हा एक सर्वात चांगला ऑप्शन आहे. हे यूजरच्या इंटरनेट ट्रॅफिकला अनेक एन्क्रिप्टेड लेयर्समधून मार्गस्थ करते, ज्यामुळे यूजरची ओळख किंवा स्थान ट्रॅक करणे कोणालाही जवळजवळ अशक्य होते. याच्या मल्टी-लेयर एन्क्रिप्शनमुळे स्पीड थोडी कमी होऊ शकते. मात्र सुरक्षेच्या मार्गाने हा सर्वात चांगला पर्याय मानला जात आहे.
Google Chrome म्हणजे काय?
Google Chrome हा Google कंपनीने विकसित केलेला एक जलद, सुरक्षित आणि वापरण्यास सोपा वेब ब्राउझर आहे, जो Windows, Mac, Android आणि iOS सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
Google Chrome कधी लाँच झाला?
Google Chrome 2 सप्टेंबर 2008 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आला.
Google Chrome मोफत आहे का?
हो, Google Chrome पूर्णपणे मोफत डाउनलोड आणि वापरता येतो.
Chrome मध्ये ब्राउझिंग डेटा कसा डिलीट करायचा?
Menu (तीन बिंदू) → Settings → Privacy and Security → Clear Browsing Data, येथून तुम्ही इतिहास, कुकीज आणि कॅश साफ करू शकता.






