Free Fire Max: Blazing Wheels मध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस! प्लेअर्सना Flame Streak स्किन मोफत जिंकण्याची संधी...
फ्री फायर मॅक्समध्ये स्टाईल आणि पावरचं कॉम्बिमेशन असणारा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. गेममध्ये Blazing Wheels ईव्हेंट सुरु झाला आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये वेपन आणि व्हीकल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स प्लेअर्स मोफत क्लेम करू शकणार आहेत. तसेच डायमंडशिवाय लक रॉयल वाउचर देखील प्लेअर्सना जिंकण्याची संधी मिळणार आहे. गेम डेवलपर Garena चं असं म्हणणं आहे की, या ईव्हेंटचा उद्देश गेमर्सचा अनुभव अधिक चांगला करणं असा आहे.
या ईव्हेंटद्वारे गेममध्ये स्पीड आणि फाइट दोन्हीची मजा प्लेअर्सना एकत्र मिळणार आहे. जर तुम्हाला स्किन आणि वाउचर जिंकायचे असेल, तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. आता आम्ही तुम्हाला गेमिंग ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया. प्लेअर्स फ्री रिवॉर्ड्स कसे जिंकू शकतात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Youtube)
फ्री फायर मॅक्सचा Blazing Wheels ईव्हेंट अतिशय खास आहे. हा एक मिशन बेस्ड ईव्हेंट आहे. म्हणजेच यामध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावं लागणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटची सुरुवात 5 नोव्हेंबरपासून झाली आहे.






