Apple ची ती चूक पडली महागात, कंपनीला भरावा लागणार करोडोंचा दंड! युजर्सना मिळणार इकते पैसे
टेक जायंट कंपनी अॅपल विरोधात सुरु असलेला खटला अखेर आता संपला आहे. 2021 मध्ये अॅपल विरोधात खटला दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये असे आरोप करण्यात आले होते की, कंपनी डिव्हाईसमध्ये असलेल्या सिरीच्या मदतीने युजर्सचे बोलणे रेकॉर्ड करत आहे. आता तब्बल 3 वर्षांनंतर कंपनीने हे प्रकरण निकाली काढण्याचा निर्णय घेतला असून आता कंपनीला करोडो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
पालकांच्या परवानगीनेच उघडणार मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट, केंद्राचे नवीन विधेयक काय सांगते?
सप्टेंबर 2021 मध्ये अॅपल विरोधात एक खटला दाखल करण्यात आला होता. यामध्ये असे आरोप करण्यात आले होते की, व्हर्च्युअल असिस्टंट सिरीच्या मदतीने ॲपल त्यांच्या युजर्सचे संभाषण रेकॉर्ड करत आहे. एका युजरने आरोप केला होता की, तो त्याच्या डॉक्टरांसोबत ज्या शस्त्रक्रियेबद्दल बोलत होता, त्याच विषयाशी संबंधित अनेक जाहिराती त्याला फोनवर दाखविण्यात आल्या. कंपनीवर आरोप करण्यात आला होता की, व्हॉईस असिस्टंट सिरीने बेकायदेशीरपणे वापरकर्त्यांचे संभाषण ऐकले आणि जाहिराती दाखवण्यासाठी थर्ड पार्टीसोबत ते संभाषण शेअर केले. (फोटो सौजन्य – pinterest)
3 वर्ष सुरु असलेल्या या खटल्यामध्ये कंपनीने सर्व युजर्सचे आरोप फेटाळून लावले होते. 2021 मध्ये खटला दाखल झाल्यापासून, ॲपलने सतत आपल्यावरील आरोप नाकारले आहेत, परंतु यावेळी कंपनीने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणताही डेटा किंवा माहिती प्रदान केलेली नाही.
तब्बल 3 वर्षांनंतर ॲपलने आता हे प्रकरण निकाली काढण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनी आता प्रभावित वापरकर्त्यांना 815 कोटी रुपये देणार आहे. यासह, प्रत्येक प्रभावित वापरकर्त्याला 1,700 रुपये मिळतील. ॲपल अजूनही हे आरोप नाकारत आहे आणि केवळ हे प्रकरण बंद करण्यासाठी सेटलमेंटसाठी सहमत आहे.
Elon Musk च्या Starlink ला एयर इंडियाचा झटका! Tata ची मोठी झेप, विमानांमध्ये मिळणार ही सेवा
ॲपलचा हा करार मंजूर झाल्यास 17 सप्टेंबर 2014 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत आयफोन आणि ॲपलचे इतर डिव्हाईस वापरणारे करोडो लोक नुकसानभरपाईचा दावा करू शकतील. प्रत्येक व्यक्तीला कराराअंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक Siri-सक्षम डिव्हाइससाठी 20 डॉलर म्हणजेच सुमारे 1715.44 रुपये मिळू शकतात. तथापि, दाव्यांच्या संख्येनुसार ही रक्कम कमी किंवा जास्त असू शकते. न्यायालयाच्या दस्तऐवजांचा अंदाज आहे की पात्रांपैकी केवळ 3 ते 5 टक्के दावे दाखल करतील. भारतीय वापरकर्त्यांना ही भरपाई मिळेल की नाही याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही.
ॲपलच्या या कराराला अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जेफ्री व्हाईट यांनी मंजुरी देणे बाकी आहे. या प्रकरणी वकिलांनी 14 फेब्रुवारी रोजी ऑकलंडमध्ये न्यायालयीन सुनावणीचा प्रस्ताव दिला आहे ज्यामध्ये सेटलमेंटच्या अटींचा विचार केला जाईल. सप्टेंबर 2014 पासून ॲपलने कमावलेल्या 705 अब्ज डॉलर नफ्याचा हा करार एक छोटासा भाग आहे.