Google Map: गुगल मॅपकडून पुन्हा झाली चूक! बांधकाम सुरु असलेल्या महामार्गवर गेली कार आणि ...
गुगल मॅप सध्या कहर करत आहे. गुगल मॅपबाबत अशाच काही बातम्या समोर आल्या आहेत ज्याने लोक हैराण झाले आहेत. हे ॲप लोकांना चुकीचा मार्ग दाखवत असल्याचा आरोप देखील अनेकांनी केला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. गुगल मॅपवरून अपघाताच्या एका प्रकरणाचा निकाल लागत नाही, की दुसऱ्या अपघाताची चर्चा होऊ लागते.
गुगल मॅपमुळे होत असलेल्या सततच्या अपघातांमुळे लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुगल मॅपवर विश्वास ठेवायचा तरी कसा अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे. गुगल मॅपमुळे होत असलेल्या या सततच्या अपघातांमुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप असलेल्या गुगल मॅपमुळे दिवसेंदिवस अनेक अपघात घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुगल मॅपमुळे घडत असलेल्या अपघातांमुळे लोकांचे बळी जात आहेत. आता पुन्हा एकदा गुगल मॅपमुळे एक अपघात झाला आहे. गुगल मॅपने कार चालकाला बांधकाम सुरु असलेल्या रस्त्याचा मार्ग दाखवला, आणि कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुन्हा एकदा गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवून कार चालकांना बांधकाम सुरु असलेल्या रस्त्यावर पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब कारमधून बरेलीहून मथुरेला जात होते. दरम्यान, गुगल मॅपने महामार्गावरील बांधकाम सुरु असलेला रस्ता मॅपवर दाखवला. मॅपवर दाखवल्याप्रमाणे कार चालकाने गाडी त्याच रस्त्याने नेली. मात्र गाडी काही अंतरावर जाताच मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने कारमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबाचा जीव वाचला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधील लोकांना सुखरूप बाहेर काढले.
IRCTC Down: पुन्हा डाऊन झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करताना प्रवाशांमध्ये गोंधळ
गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात बरेलीचे रहिवासी विमलेश श्रीवास्तव आणि कुशव कारने मथुरेला जात होते. मथुरेला जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. त्यांची गाडी मथुरा-बरेली महामार्गाजवळ पोहोचली, मात्र या ठिकाणी कोणतेही बोर्ड लावण्यात आले नव्हते. त्यामुळे चालकाने गाडी महामर्गावर नेली आणि ती कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली.
गुजरातमधील एक कुटुंब पालनपूर येथून जिम कॉर्बेट पार्कला जात होते. हे कुटुंब गुगल मॅपच्या मदतीने सहलीला निघाले होते. मात्र गुगल मॅपमुळे त्यांचा रस्ता चुकला आणि कार चुकीच्या दिशेला गेली. नकाशातील चुकीच्या ठिकाणाहून भरकटलेली कार यूपीच्या बिजनौर जिल्ह्यात पोहोचली. गाडी नगीना येथील मजलेटा मार्केटमध्ये आल्यानंतर जल निगमच्या खोदलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात अडकली. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.